दोन अल्पवयीन ताब्यात
marathinews24.com
पुणे – Pune Crime News : जुन्या वादातून अल्पवयीन मुलाला भेटायला बोलावून घेत त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २ ) रात्री दहाच्या सुमारास अत्यंत वर्दळीच्या भिडे पुलाजवळ घडली. प्राणघातक हल्ल्यात अल्पवयीन गंभीर जखमी झाला असून डेक्कन पोलिसांनी अल्पवयीन हल्लेखोर मुलांना ताब्यात घेतले आहे. शौर्य मोहिते (वय १७) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, ऐन दिवाळीत रहदारीच्या ठिकाणी अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्यामुळे पोलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
दुकानाचे कुलूप तोडून १ लाखांचे पितळी कडे चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्वयीन आणि शौर्य मोहिते (वय १७) यांच्यात काही दिवसांपुर्वी वाद झाला होता. त्याच रागातून टोळक्याने सोमवारी संध्याकाळी शौर्यला भेटायला बोलावले. भिडे पुलाजवळील हॉटेल मुरलीधरच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीररित्या जखमी केले. दरम्यान, हल्ला होण्यापूर्वी टोळके शौर्यसोबत बोलत थांबले होते. त्यानंतर तिघांच्या टोळक्याने शौर्यवर कोयत्याने वार करुन जखमी केले.
Pune Crime News शौर्यला गेल्या दोन-तीन दिवसांपासून काहीजण भेटण्यासाठी बोलावत होते. मात्र, वाद टाळण्यासाठी शौर्य त्यांच्या भेटीला गेला नव्हता. सोमवारी हल्लेखोरांना त्याला बोलावून घेत वार केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ अधिकार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हल्ला नेमका किती जणांनी मिळून केला, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, यादृष्टीने डेक्कन पोलिसांकडून तपास केला जात आहे.
























