Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune Theft News : दुकानाचे कुलूप तोडून १ लाखांचे पितळी कडे चोरीला

हॉटेलमधील सव्वा दोन लाखांची रोकड चोरीला

गुरुवार पेठ आणि धायरीतील घटना; दोन चोरीच्या प्रकरणांत पोलिसांकडून गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख रुपयांचे पितळी कडे चोरुन नेल्याची घटना गुरुवार पेठेत घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनैतिक संबंधांचा जाब विचारणाऱ्या पत्नीच्या खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाचे रविवार पेठेत धनलक्ष्मी मेटल्स हे भांडी विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानातील लोखंडी जाळी उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील पितळी कडे पोत्यात भरुन ठेवले होते. चोरट्यांनी दोन पोती चोरुन नेल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. त्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार भोसले तपास करत आहेत.

कारखान्यातून साहित्य चोरीला

धायरीतील ओैद्योगिक वसाहतीत असलेल्या एका कारखान्यात शिरलेल्या चोरट्यांनी तांब्याची तार, तसेच ॲल्युमिअमचे साहित्य चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावासयिकाचा धायरीतील जी. एन. पोकळे इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये छोटा कारखाना आहे. चोरटे कारखान्यात शिरले. चोरट्यांनी कारखान्यात ठेवलेली तांब्याची तार, ॲल्मुमिनिअम साहित्य असा ९० हजार ६०० रुपयांचा माल चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×