Breking News
Nana Patekar Funeral : ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारJute Products : तागापासून तयार केलेल्या वस्तूच्या वापराने पर्यावरण संवर्धन शक्य-राष्ट्रीय ताग मंडळाचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशी भूषण सिंह यांचे मतMaharashtra Drought : केंद्रीय पथकाकडून महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी दौरा सुरूRavi Paranjape Art : सर्जनशीलता हीच खऱ्या कलाकाराची ओळख-स्मिता रवी परांजपेPune Crop Panchnama : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांत खरीप पिकांचे पंचनामे सुरुPolice Duty Meet : पोलिस कर्तव्य मेळाव्यात विजेत्यांचा गौरवDrought Relief Udgir : चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करा; ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्या- डॉ. नीलम गोऱ्हेMPSC Student Protest : पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीGlow Garden Lonavala : लोणावळ्यात वेट‘एन जॉयमध्ये ‘ग्लो गार्डन सुरुCSR Social Impact : सीएसआर गुंतवणुकीचा सामाजिक परिणाम मोजणे आवश्यक

Pune Election : पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीकरिता १६ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात

सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेसंदर्भात कोणतीही तक्रार, अडचण किंवा आक्षेप असल्यास नागरिकांनी जिल्हा निवडणूक शाखेच्या १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत मतदार, उमेदवार तसेच संबंधित घटकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी निवडणूक प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कोणतीही बाब निदर्शनास आल्यास ती तातडीने निवडणूक प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि शिस्त कायम राहण्यासाठी नागरिकांनी आपल्या तक्रारी अथवा सूचना १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर नोंदवाव्यात. तसेच तक्रारींची नोंद करताना संबंधित घटनेची आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्याच्या निवडणूक शाखेच्या संकेतस्थळावर पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील आवश्यक माहिती, मतदार याद्या आणि निवडणूकविषयक प्रसिद्धीपत्रके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×