Breking News
Pune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालतPune Police Crime News : दारुच्या नशेत पुणे पोलीस आयुक्ताच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्नAhilyadevi Holkar Karj Mukti Yojana : कर्जमुक्ती योजनेंतर्गत ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमाPune Viman Nagar Drug Seizure : पुण्यात कॉस्मेटिक ज्वेलरीच्या दुकानातून ई-सिगारेट, हुक्का अन् गांजाची विक्रीPune Police News : पत्नीच्या इच्छेविरुद्ध केला गर्भपात, पुण्यात पोलीस उपनिरीक्षक निलंबित

Pune Exhibition 2026 : ‘एक भारत, श्रेष्ठ भारत – फॅशन अँड लाइफस्टाइल एक्स्पो २०२६’ ला पुणेकरांचा प्रतिसाद

दिवाळीच्या खरेदीसाठी विविध वस्तूंची रेलचेल; ११० हून अधिक स्टॉल्सचा समावेश; शेवटचे दोन दिवस बाकी; पुणेकरांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आयोजकांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि शिखाज् कारीगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक भारत, श्रेष्ठ भारत – फॅशन अँड लाइफस्टाइल एक्स्पो २०२६’ ला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान बंड गार्डन रोडवरील पूना क्लब येथे हे चार दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध आकर्षक वस्तूंची खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

पाकिस्तानात “धाराऊ” मराठी चित्रपटाचा डंका – सविस्तर बातमी

देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कारागीर, उद्योजक आणि स्टॉलधारकांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. हातमागावरील (हँडलूम) वस्त्रे, पारंपरिक हस्तकला, फॅशन व लाइफस्टाइलशी संबंधित उत्पादने, दागिने आणि गृहसजावटीच्या वस्तू हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. दिवाळी जवळ आल्याने सणासाठी आवश्यक विविध वस्तू, आकर्षक सजावटीचे साहित्य आणि नातेवाईक व आप्तस्वकीयांना भेट देण्यासाठी उपयुक्त भेटवस्तूंचीही येथे रेलचेल आहे. विशेष म्हणजे, गायीच्या शेणापासून तयार केलेल्या विविध कलात्मक व सजावटीच्या वस्तू ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

खाद्यपदार्थांच्या विभागातही विविध राज्यांतील खास खाद्यसंस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे. मैदाविरहित तसेच ज्वारी, नाचणी, बाजरी आणि गहू यांपासून तयार केलेली विविध खाद्य उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय झिरो ऑइल अर्थात तेलाचा वापर न करता तयार केलेल्या खाद्यपदार्थांसह देशाच्या विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधीही या प्रदर्शनात मिळत आहे.

या प्रदर्शनात ११० हून अधिक स्टॉल्सचा समावेश असून, महिला स्टॉलधारकांची संख्या लक्षणीय आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तू, पारंपरिक कलाकुसरीचे नमुने आणि विविध उत्पादनांच्या माध्यमातून त्यांच्या उद्योजकीय कौशल्याला व्यासपीठ मिळत आहे. भारतीय हस्तकला, पारंपरिक कारागिरी आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबरोबरच कारागीर, उद्योजक, डिझायनर्स आणि ग्राहक यांना एकत्र आणण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

शेवटचे दोन दिवस बाकी; पुणेकरांनी भेट देण्याचे आवाहन

प्रदर्शनाचे आता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. दिवाळीची खरेदी, आकर्षक भेटवस्तू, पारंपरिक हस्तकला, हातमागावरील वस्त्रे, पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तू आणि विविध राज्यांतील खाद्यपदार्थ अशा अनेक गोष्टींची खरेदी व अनुभव एकाच ठिकाणी घेण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी कुटुंबीयांसह या प्रदर्शनाला भेट देऊन विविध उत्पादनांची खरेदी करावी आणि कारागीर व महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रदर्शनाचा समारोप रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×