Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षकांकडून पूर्वतयारीचा आढावा

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीचा आढावा

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक ओम प्रकाश बकोरिया आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक डॉ. हनमनलू तुम्मोड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या उपस्थितीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला.

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार – सविस्तर बातमी

विभागीय आयुक्त कायालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे गुरुवारी (ता. ८) आयोजित बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी, पोलीस अधीक्षक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आदी उपस्थित होते.

मतदार यादीत नावाच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि मतदारांना मतदान पद्धतीची माहिती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, अशा सूचना श्री. बकोरिया यांनी यावेळी दिल्या.

डॉ. तुम्मोड म्हणाले, कोणतीही निवडणूक नवीन प्रकारचे प्रशिक्षण असते. त्यामुळे मतदान व मतमोजणी प्रसंगी निर्माण होणारी प्रत्येक संभाव्य परिस्थिती गृहीत धरून त्याची पूर्वतयारी करावी. सर्व बाबी गांभिर्याने घेऊन समन्वयाने निवडणूक यशस्वी करावी. प्रशिक्षणाला प्राधान्य द्यावे.

श्रीमती तेली- उगले म्हणाल्या, मतदारांची संख्या मर्यादित असली तरी मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती मोठी असल्याने सर्व जिल्ह्यांतील निवडणूक प्रशासनाने समन्वय राखणे गरजेचे आहे. आचारसंहितेच्या तक्रारींचे वेळेत निर्मूलन, आचारसंहितेचे पालन होईल याला प्राधान्य द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी जिल्हाधिकारी तथा सहायक जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथकांची स्थापना, मतदान, मतमोजणी पथके आदींचे प्रशिक्षण, मतदान केंद्रे, स्ट्राँगरूम, टपाली मतपत्रिका, निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्राद्वारे (ईडीसी) मतदानाची व्यवस्था, मतदान केंद्रांवर पुरवावयाच्या किमान आवश्यक सुविधा, मतदान प्रक्रिया, आचारसंहिता आदींच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण व नियंत्रण कक्ष, स्वीपअंतर्गत मतदार जागृती कार्यक्रम आदींविषयी माहिती सादर करण्यात आली.

पोलीस विभागाच्यावतीने निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, पोलीस मनुष्यबळाचे नियोजन आदींची माहिती देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×