Breking News
Pune Police Crime News : बीएसनएलची केबल चोरणारा अटकेतPune Road Accident News : पुण्यात मोटारीच्या धडकेत रिक्षा प्रवासी महिलेचा मृत्यूShivajinagar House Robbery Pune : शिवाजीनगर भागात घरफोडी; पावणेतीन लाखांचा ऐवज चोरलाHadapsar Crime News Pune : पुण्यात काळेपडळ, चिंतामणीनगरमध्ये टोळक्याचा राडाAmit Shah Pune Visit : महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाहPune Police Crime News : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारे सराईत तडीपारPune Mephedrone Drug Seizure : पुण्यात मेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतBeed District News : दुष्काळ आणि जमिनीच्या वादातून तरूणाची आत्महत्याFarmer ID Registration Maharashtra : कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावाWakdewadi Bus Stand Theft : वाकडेवाडी एसटी स्थानकात महिलेच्या सुटकेसमधून ऐवज चोरीला

पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६; पिंपरी-चिंचवड शहरात सायकल स्पर्धा मार्गावरील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

बजाज पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा देणार जिल्ह्यातील कृषी व पर्यटन क्षेत्राला चालना

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश जारी

marathinews24.com

पुणे – पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित पहिल्या टप्प्याच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारच्या खाजगी आणि सरकारी शाळांना मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना – सविस्तर बातमी

पुणे जिल्हा प्रशासन, बजाज तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज पुणे ग्रँड टूर-२०२६ युसीआय मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा १९ ते २३ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल यांनी निर्धारित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकानुसार आयोजित करण्यात येत असून २० जानेवारी रोजी या स्पर्धेचा पहिला टप्पा टि. सी.एल सर्कल हिंजवडी फेज-३ येथून सुरु होणार असून ती पुढे- टी.सी.एस सर्कल-मेगापोलीस सर्कल सिंफोनी सोसायटी समोरुन उजवीकडे वळून- बापुजी बुवा मंदिर मार्गे पुणे ग्रामीण हद्दीत जावून परत डोणे फाटा येथून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करुन पुढे रोहिदास मारुती सावळे चौक (डोणे फाटा) – डावीकडे वळून आढले बुद्रुक-बेबड ओहळ,- चांदखेड-कासारसाई-नेरे-मारुंजी-लक्ष्मी चौक-भुमकर चौक-अंडरपास मार्गे-डांगे चौक-अंडरपास मार्गे आदित्य बिर्ला हॉस्पिटल समोरुन रिव्हर व्ह्यू चौक वाल्हेकरवाडी-टि जंक्शन डावीकडेवळून छत्रपती शिवाजी महाराज चौक वाल्हेकरवाडी-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रावेत उजवीकडे वळून डॉ. डी. वाय पाटील कॉलेज आकुर्डी येथे समाप्त होणार आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×