Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पुण्यातील जमीन घोटाळा; शीतल तेजवाणीला अटक

पुण्यातील जमीन घोटाळा; शीतल तेजवाणीला अटक

मुंढवा जमीन प्रकरण

marathinews24.com

पुणे – शहरातील मुंढवा परिसरातील जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवाणी हिला पुणे पोलिसांनी अखेर बुधवारी (दि. ३ ) अटक केली आहे. जमीन विक्री प्रकरणात २७५ व्यक्ती असून, त्यांनी जमीन पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी करून शीतल तेजवाणी यांना लिहून दिली होती. त्यानुअषंगाने १८ नोव्हेंबरला आर्थिंक गुन्हे शाखेने तिचा जबाब नोंदविला होता. त्यानंतर चौकशीदरम्यान तेजवाणीचा प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार पोलिसांनी तिला अटक केली आहे.

नवरगावच्या मथुरा ताई प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर प्रशासनाची तत्काळ मदत – सविस्तर बातमी 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने मुंढव्यातील ४० एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर बोपोडीतील जमीन घोटाळ्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दाखल आहे. संबंधित गुन्हा खडक पोलीस ठाण्याकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. त्यानंतर आर्थिंक गुन्हे शाखेने दोन वेळा शीतल तेजवाणीचा जबाब नोंदवला होता. त्यानुसार याप्रकरणी तिचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याानंतर तिला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तेजवाणीच्या अटकेमुळे प्रकरणातील आणखी इतर आरोपींची भंबेरी उडाली आहे.

बोपोडीतील जमीन व्यवहाराची नोंदणी पुण्यातील गुरुवार पेठेतील हवेली तहसीलदार कचेरीत झाली आहे. त्यामुळे खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तहसीलदार येवलेने संगनमत करून हा व्यवहार केल्याचे स्पष्ट झाले होते. त्याबाबत शासकीय चौकशीची प्रक्रिया पार पडल्यानंतर शासनाने तहसीलदार येवलेला निलंबित केले होते. जमिनीचा अपहार करुन बेकायदा आदेश आणि पत्र तयार करुन शासनाची फसवणूक केली. त्यामुळे येवले याच्यासह इतरांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. व्हिजन प्रॉपर्टीतर्फे कुलमुखत्यार धारक राजेंद्र रामचंद्र विध्वंस (रा. इंद्रा मेमरीज, सकाळनगर, बाणेर रस्ता), ऋषीकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, विद्यानंद अविनाश पुराणिक (रा. इंदूर ,मध्य प्रदेश), जयश्री संजय एकबोटे (रा. चित्रलेखा बिल्डिंग, कुलाबा, मुंबई), हेमंत गवंडे (रा. सकाळनगर, बाणेर रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नायब तहसीलदार प्रविणा शशिकांत बोर्डे यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी मिळवले पत्र

अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील याने आरोपी शीतल तेजवाणी हिच्याकडून शेतजमीन नावावर असलेल्यांचे कुलमुखत्यारपत्र बनवून घेतले. मुंढव्यातील ४० एकराची ३०० कोटी रूपयांत खरेदी केली. विशेषतः आयटी पार्कच्या नावाखाली उद्योग संचालनालयाकडून इरादा पत्र घेतले. त्यानुसार मुद्रांक शुल्कात सवलत मिळण्याचा अर्ज दाखल केला. त्यानुसार तब्बल २१ कोटी रूपयांची सवलत देण्यात आली होती. दरम्यान, संबंधित जमिनीची सर्व जुनी कागदपत्रे, सातारबारा उतारे, त्यावरील बदलत गेलेल्या नोंदी आणि तत्सम अनेक कागदपत्रांची आवश्यकता होती. त्यासाठी पोलिसांच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, मुद्रांक शुल्क कार्यालय आणि अन्य महसूल विभागातील अधिकार्‍यांच्या भेटी घेऊन आवश्यक कागदपत्रे एकत्रित केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×