Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune Metro Line 3 Project : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; मेट्रोमुळे विकासाला गती- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Metro Line 3 Project

पुणे मेट्रो-३ प्रकल्पामुळे प्रवास होणार वेगवान आणि सुरक्षित; रिंगरोड व मिसिंग लिंक प्रकल्पामुळेही वाहतुकीला दिलासा

marathinews24.com

पुणे – Pune Metro Line 3 Project ; शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी करण्यामध्ये मेट्रो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मेट्रो-३ हा पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला कलाटणी देणारा प्रकल्प असून, पुण्याच्या भविष्याला नवा आकार देणारा आणि नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीच्या समस्या कमी करणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पुणे मेट्रो देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो ठरणार-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार – सविस्तर बातमी 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मेट्रोची ऐतिहासिक भेट मिळत आहे. दिलेला शब्द पाळून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची कार्यपद्धती सरकारने ठेवली असून, महाराष्ट्राचा विकास वेगाने पुढे जात असल्याचे शिंदे म्हणाले. Pune Metro Line 3 Project पुणे मेट्रो-३ हा देशातील सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात आलेला पहिला मेट्रो प्रकल्प आहे. राष्ट्रीय मेट्रो रेल धोरण २०१७ अंतर्गत डीबीएफओटी पद्धतीने या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. प्रकल्प मिशन मोडवर पूर्ण केल्याबद्दल पीएमआरडीए, महामेट्रो, टाटा प्रोजेक्ट्स, सीमेन्स आणि संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये महिलांचा मोठा सहभाग असून, मेट्रो संचालनातही महिला महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत. महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, हे या प्रकल्पातून पुन्हा अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गामुळे पुण्याच्या विकासाला चालना मिळाली असून, मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार आहे. तसेच पुण्याभोवती रिंगरोड विकसित करण्यात येत आहे. या सर्व प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल. पुणेकरांचे जीवन अधिक गतिमान आणि प्रवास अधिक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुण्याच्या विकासात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानाचा त्यांनी विशेष उल्लेख केला. मेट्रोमुळे पुणेकरांना मिळणाऱ्या सुविधांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, सुरुवातीला पुण्यात मेट्रोला किती प्रतिसाद मिळेल, याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, आतापर्यंत ९० लाखांहून अधिक प्रवाशांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिली आहे. हा प्रवास आरामदायी आणि वेळेची बचत करणारा आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे. पुण्याला वाहतूक कोंडीमुक्त आणि आधुनिक शहर बनविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×