पुणे पोलीस आयुक्तांचे पीआरओ निलंबित; बडतर्फीची प्रक्रिया सुरू

पुणे पोलीस आयुक्तांचे पीआरओ निलंबित; बडतर्फीची प्रक्रिया सुरू

तब्बल २० लाखांच्या तोडपाणीचा केला प्रयत्न

marathinews24.com

पुणे – जनसंपर्क अधिकारी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे पीआरओ असलेले सहायक पोलीस फौजदार प्रवीण घाडगे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू झाली असून, सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

भाडेतत्वावर लॅपटॉप घेण्याचे आमिष, २ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी 

कुख्यात गुंड आंदेकर टोळीशी संबंधित असलेल्या एकाला मदत केल्याचा ठपका घाडगे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्तांचे नाव सांगत सहायक पोलीस आयुक्तांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न घाडगे यांनी केला होता. आंदेकर टोळीशी संपर्कात असलेला बिल्डर अविनाश पवार याला जमिनीच्या वादप्रकरणात मदत मिळावी, यासाठी हा दबाव टाकला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्याने कोणतीही मदत करण्यास स्पष्ट नकार दिला. याबाबत पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिला.

याप्रकरणात ‘स्टेनली’ नावाचा व्यक्ती मध्यस्थ म्हणून काम करत होता. तो थेट घाडगे यांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने स्टेनलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी स्टेनलीने घाडगे यांनी प्रकरण मिटवण्यासह तडजोडीसाठी २० लाख रुपयांची मागणी केल्याचे कबूल केले. तसेच आंदेकर टोळीशी संबंधित अविनाश पवार याचे प्रकरण घेऊन घाडगे यांच्याकडे गेल्याची कबुलीही दिली. विशेषतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आंदेकर टोळीविरोधात कारवाई सुरू असताना, बेकायदेशीर मालमत्ता, खंडणी यासारख्या प्रकरणांचा पर्दाफाश होत होता. मात्र दुसऱ्या बाजूला पोलीस खात्यातीलच घाडगे आंदेकर टोळीला मदत होईल यासाठी काम करत असल्याचे तपासात उघड झाले.

घाडगे यांच्याविरोधात यापुर्वीही पोलीस आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून प्रकरणे मिटवण्याचा दबाव टाकत असल्याचे स्पष्ट झाले होते. तक्रारीनंतर त्यांची ‘भरोसा सेल’मध्ये बदली केली होती. मात्र तरीही त्यांच्या कृत्यांना आळा बसला नाही. लोकांना फोन करून आपण पुन्हा पीआरओ पदावर येणार असल्याचे ते सांगत होते. आईची तब्येत खराब असल्याचे कारण देत साइड पोस्टिंग मिळवल्याची अफवा त्यांनी पसरवली होता. पीआरओ पदाचा गैरवापर करून सातत्याने अनैतिक व बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी झाल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रवीण घाडगे यांचे निलंबन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×