Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune Police Diwali Security : पुण्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दक्षता अन सुरक्षा- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune Police Diwali Security

मध्यवर्ती वाहतूक सुधारसाठी प्राधान्य, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त

marathinews24.com

पुणे – Pune Police Diwali Security : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली असून, मध्यवर्ती भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यासोबत खरेदीनिमित्त मध्यभागातील गर्दीवर नियंत्रण ठेवणे, वाहतूक सुरळित करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. गर्दीत महिला सुरक्षितता, सोनसाखळी चोर्‍या रोखण्यासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके कार्यरत असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

उद्योजकाची ‘वायप्लस’ सुरक्षा कोणाच्या शिफारशीवरून ? – सविस्तर बातमी 

खरेदीच्या निमित्ताने शहरातील विविध भागातील नागरिक मध्यवर्ती भागात दाखल होत आहेत. विशेषतः महिलांचे प्रमाण अधिकचे असून, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी नियोजन केले आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, चोर्‍या रोखण्यासाठी प्राधान्य देणे, मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध केले आहे. त्यासोबतच विविध प्रशासनाकडून उपलब्ध असलेल्या वॉर्डनकडून चौकाचौकात वाहतूक नियमन केले जात आहे. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेसोबत बेशिस्तांविरुद्ध कारवाई करणे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींविरुद्ध प्रतिबंधत्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. साधू वासवानी चौक, मुंढवा चौका, वाघोली परिसर, लक्ष्मी रोड, मध्यवर्ती भागातील वाहतूक सुरळित ठेवण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्याचे सांगण्यात आले.

हद्दीत शांतता ठेवा, वाहतूकीवर नजर ठेवा-अमितेश कुमार

कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रत्येक ठाणे प्रमुखांनी हद्दीत शांतता कायम ठेवणे गरजेचे आहे. प्रामुख्याने सण-उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यासोबतच नागरिकांना त्रास होउ देउ नका. हद्दीतील वाहतूक सुरळित ठेवण्यासाठी विशेष लक्ष देण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. Pune Police Diwali Security मध्यवर्ती भागातील व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे, पोलिसांना सहकार्य करावे. दुकानालगत, शेजारी विना परवाना हॉकर्स उभा करण्यास संमती देउ नये. नागरिकांसोबत सुंवाद ठेवण्याचे आवाहनी अमितेश कुमार यांनी केले आहे.

ठाणे प्रमुखांना कानपिचक्या, तक्रारदारांचे समाधान करा

पोलीस दल हे नागरिकांची सेवा करण्यासाठी असून, पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदाराचे समाधान करणे सर्वांची जबाबदारी आहे. यापुर्वी काही घटनांमध्ये काही ठाणे प्रमुखांसह अधिकारी, अमलदारांनी पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी त्यांना निलंबनाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे भविष्यात अशाप्रकारे कोणत्याही प्रकारचे चुकीचे वर्तन आपल्याकडून होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा कानपिचक्या पोलीस आयुक्तांना बैठकीत अधिकार्‍यांना दिल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×