Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Rana Suryawanshi Y Plus Security : उद्योजकाची ‘वायप्लस’ सुरक्षा कोणाच्या शिफारशीवरून ?

Rana Suryawanshi Y Plus Security

माजी आमदार धंगेकर यांच्याकडून चौकशीची मागणी

marathinews24.com

पुणे – Rana Suryawanshi Y Plus Security : ‘उद्योजक राणा सूर्यवंशी यांना यापूर्वी ‘वायप्लस’ सुरक्षा व्यवस्था कोणाच्या शिफारशीवरुन आाणि कोणत्या निकषांद्वारे देण्यात आली, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. प्रकरणातील मुख्य सूत्रधाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांना निवेदन दिले.

शिवाजीनगर न्यायालयासह मेट्रो स्थानकात बाँम्बची धमकी – सविस्तर बातमी 

राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामती परिसरात झालेल्या हल्ला झाला होता. त्यापार्श्वभूमीवर सोमवारी धंगेकर यांनी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांची भेट घेउन निवेदन दिले. ‘पोलिसांनी राजकीय दबाबाला बळी न पडता सूर्यवंशी यांच्यावर यापूर्वी झालेल्या हल्ल्याची पुन्हा चौकशी करावी. त्यांना दिलेली ‘वायप्लस’ सुरक्षेची उच्चस्तरीय चौकशी करावी. सूर्यवंशी यांची विशेष सुरक्षा व्यवस्था काढून घेतली. त्यानंतर त्यांना संरक्षणासाठी एक पोलीस कर्मचारी नेमला. संबंधित पोलीस संरक्षण त्वरित काढून घेण्यात यावे. स्वत:ला उद्योजक म्हणविणार्‍या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना पोलीस संरक्षण दिले आहे. पोलिसांनी याबाबत सखोल परीक्षण करुन राणाचे संरक्षण मागे घ्यावे अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.

अन्यथा पोलीस महासंचालक कार्यालयासमोर आंदोलन

उद्योजक सूर्यवंशी यांना विशेष सुरक्षा व्यवस्था कोणी दिली?, (Rana Suryawanshi Y Plus Security) त्यांना मदत करणारे कोण आहेत? या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत. अन्यथा पोलीस महासंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. ‘राजकीय किंवा व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योजकानी स्वतःवर हल्ला घडवून आणला. त्यासाठी काही जणांची मदत घेतली’, असा आरोप धंगेकर यांनी केला आहे.

भाजप नेत्यांनी काय काम केले ?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दिल्ली दौर्‍यांचे स्वागत करतो. मित्रपक्षाने निवडणुकीत काम केले नाही, असा आरोप केला जातो. मित्र पक्षाने काम केले का नाही, याचे उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देतील. मात्र, भाजप नेत्यांनी काय काम केले, याचेही उत्तर मिळाले पाहिजे.’ असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×