Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

गणेशोत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुण्यात ५ पोलीस ठाण्यांना मंजुरी, पोलीस आयुक्तांच्या प्रयत्नांना यश

७ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा ६१८ अधिकारी, ६ हजार २८६ अमलदार

marathinews24.com

पुणे – गणशोत्सवासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, उत्सव निविर्घ्नपणे पार पाडण्यासाठी तब्बल ७ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. त्याशिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियोजन, सर्व्हेलन्स कॅमेरे, मोबाइल सर्व्हेलन्स वाहने कार्यरत राहणार आहेत. तसेच बीडीडीएस पथक, क्यूआरटी टीम, गुन्हे शाखेतील साध्या वेशातील कर्मचारी अधिकारीही तैनात केले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, अपर आयुक्त मनोज पाटील, अपर आयुक्त राजेश बनसोडे उपस्थित होते.

सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनामार्फत विशेष तपासणी मोहिम – सविस्तर बातमी 

पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या ३ हजार ९५९ असून, तब्बल ७ लाख ४५ हजार ९४४ खासगी गणेश मंडळे आहेत. गणेशोत्सव दि.२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर कालावधीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. स्थानिक पोलिस, वाहतूक शाखा, गुन्हे शाखेच्या पथकांना ठिकठिकाणी तैनात केले आहेत. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी हद्दीतील गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ८२ आढावा बैठका, चौकी स्तरावर ३२ बैठका, ६० शांतता कमिटी बैठका, २४ महिला दक्षात कमिटीच्या बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार मंडळ पदाधिकार्‍यांशी सुसंवाद साधला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समिती, पोलीस मित्र समित्यांच्या बैठकीत चर्चा केली आहे.

गणेशोत्सवातील पोलिसांचा बंदोबस्त

अपर आयुक्त-४, पोलीस उपायुक्त -१०, सहायक पोलीस आयुक्त -२७, पोलीस निरीक्षक- १५४, एपीआय/ उपनिरीक्षक-६१८, पोलीस अमंलदार-६ हजार २८६, होमगार्ड-११०० एसआरपीएफ- एक तुकडी, त्याशिवाय बीडीडीएस पथके, क्यूआरटी टीम, वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांना नियुक्ती केली आहे. गुन्हे प्रतिबंधासाठी अ‍ॅन्टी चेन स्नॅचिंग पथक, मोबाइल चोरीविरोधी पथक, वाहन चोरी विरोधी पथक, महिला व बाल सुरक्षा पथक कार्यरत राहणार आहेत. गुन्हे शाखेचे १ सहायक उपायुक्त, ६ पोलीस निरीक्षक, ३२एपीआय, २५३ पोलीस अमलदार नियुक्त केले आहेत.

७ दिवस वाजवा रे वाजवा, दोन दिवस मद्यविक्री बंद

सार्वजनिक गणेशोत्सव कालावधीत ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर आणि ४ व ६ सप्टेंबर असे सात दिवस सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा मंडळांनी वापर करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे. दरम्यान, २७ ऑगस्ट आणि ६ सप्टेंबरला शहरासह जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

महत्वाच्या उपाययोजना

मध्यवर्ती भागात २० ठिकाणी टॉवर वॉचवर पोलीस बंदोबस्त

पोलीस चौकी ते परिमंडळ विभागानुसार पेट्रोलिंगला प्राधान्य

मानाच्या आणि महत्वाच्या गणपती मंडळाजवळ पोलीस मदत केंद्र

दंगाकाबूच्या अनुषंगाने पोलीस ठाणे स्तरावर ३९ बैठका

एआय पॉवरर्ड व्हिडिओ

जीपीएस ट्रॅिंकग अ‍ॅड अलर्ट सिस्टीम, ट्राफिक मॉनिटरिंग

पुणे पोलिसांकडून मानवंदना

यंदाचा गणशोत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा केला जात असून, त्यादृष्टीने पुणे पोलिसांकडून निवडक चौकामध्ये विद्युत रोषणाई, पोलीस बँण्डचे वादन केले जाणार आहे. तसेच श्वान पथकाकडून डॉग शोचेही आयोजन केले जाणार आहे.

शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भाविकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीन काळजी घेत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. बाप्पाच्या आशीवार्दाने उत्सव निविर्घ्नपणे पार पडणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजन केले आहे. मध्यवर्ती वाहतूक नियोजन, पार्विंâग व्यवस्था, साध्या वेशातील अधिकारी कर्मचारी, विविध पथके नागरिकांसह पुणेकरांच्या दिमतीला रात्रंदिवस कार्यरत राहणार आहेत. अमितेश कुमार , पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×