पुणे पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला महिलेचा जीव

पुणे पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला महिलेचा जीव

पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांनी केले कौतुक

marathinew24.com

पुणे – पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचा जीव वाचवण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि.२०) संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास नवीन कात्रज बोगद्याजवळील मुंबई पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या डोंगरावर घडली आहे. उंच डोंगराच्या कड्यावरून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेचे समुपदेशन करून तिला आंबेगाव पोलिसांनी सुरक्षित खाली उतरवले . त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

सराईत दुचाकी चोरट्याला अटक, वाहन जप्त – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर आंबेगाव पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. महामार्गालगत असलेल्या २०० ते २५० फूट उंच डोंगराच्या कड्यावर महिला उभी होती. महिला उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले. यानंतर पोलिसांनी डोंगराच्या दुसऱ्या बाजूने त्याठिकाणी पोहोचत महिलेशी संवाद साधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ती महिला कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

पोलिसांनी संयमाने आणि समजूतदारपणे समुपदेशन केल्यामुळे तिचे मन वळले. अखेर तिला सुरक्षितपणे खाली आणण्यात यश मिळवले. प्राथमिक चौकशीत संबंधित महिलेने कौटुंबिक कारणांमुळे टोकाचे पाऊल उचलण्यासाठी येथे आल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×