Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शनातून पुणेकरांनी अनुभवले सैन्याचे सामर्थ्य

स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शनातून पुणेकरांनी अनुभवले सैन्याचे सामर्थ्य

दोन दिवसीय प्रदर्शन; प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजन

marathinews24.com

पुणे – स्नायपर एमके १, एयर डिफेन्स गन, अँटी मटेरियल रायफल (विध्वंसक), एके ४७ रायफल, एमएमजी गन, टियर गॅस गन यांसह ड्रोन, आर्टिलरी अम्युनिशन, एरियल बॉम्ब अशा देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकटी देणाऱ्या अभेद्य शस्त्रांना पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित प्रदर्शनात भारतीय पायदळ, नौदल, हवाई दलासाठी लागणारी शस्त्रास्त्रे, दारुगोळा यांसह विविध प्रकारची युद्धसज्जतेसाठी आवश्यक असलेल्या साधनांची मॉडेल्स देखील ठेवण्यात आली आहेत.

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना ‘डी. लिट.’ पदवी प्रदान – सविस्तर बातमी 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय बनावटीच्या शस्त्रांचे प्रदर्शन बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरासमोर जय गणेश प्रांगण येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी आमदार व ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड चे मुख्य महाव्यवस्थापक अरुण ठाकूर, कर्नल बद्रीदत्त गनोला, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, अजय मोझर, रुणाल केसरकर, अंकुश रासने यांसह लष्करातील माजी अधिकारी, स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, भारत सरकार रक्षा मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेड ने पुण्यात साकारलेली आणि भारतासह विविध देशांत निर्यात केली जाणारी भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. दि. २६ जानेवारी २०२६ पर्यंत सकाळी १० ते रात्री १० यावेळेत हे प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे. सैन्यदलातील जवान या प्रदर्शनाच्या नियोजनात सहभागी असून पुणेकरांनी प्रत्येक शस्त्राविषयी माहिती देखील तात्काळ घेता येत आहे. ग्रेनेड, लढाऊ विमानातील बॉम्ब, रॉकेटचे विविध प्रकार, तोफांकरीता लागणारा दारुगोळा, विविध प्रकारचे ड्रोन, मल्टी बॅरेल लॉन्च सिस्टिम, बुलेटस्, हँड ग्रेनेड, अ‍ँटि सम्बरिन रॉकेट, एरियल बॉम्ब यांसह विविध प्रकारची शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी मिळत आहे.

आत्मनिर्भर, बलशाली व विश्वगुरू भारत साकारण्याकरिता संपूर्ण देशात शस्त्रास्त्रे पुरविण्यासाठी पुण्यातील म्युनिशन्स इंडिया लिमिटेड कार्यरत असून त्यांच्या सहकार्याने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य असून शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांसह पुणेकरांनी मोठया संख्येने भेट द्यावी, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×