Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरार

बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरार

स्पर्धेमुळे पुण्याचे सौंदर्य अधिक खुलले, नामवंत खेळाडूंचे कौशल्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी; स्पर्धेच्या माध्यमातून ‘सायकल चालवा, आजाराला पळवा’चा संदेश

marathinews24.com

पुणे – बजाज पुणे ग्रँड टूर अंतर्गत आज पहिल्या टप्प्याची सुरुवात टी.सी.एस. सर्कल, हिंजेवडी येथून उत्साहात झाली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या सायकल स्पर्धेला अबालवृद्ध पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय म्हणून अभिमान बाळगत नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून सायकलपटूंना प्रोत्साहन दिले.

पुणे उत्तर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार – सविस्तर बातमी 

या वेळी नागरिकांनी नामवंत सायकलपट्टूंची तंदुरुस्ती, शिस्तबद्ध तयारी आणि धावत्या सायकलींचा वेगवान थरार अनुभवला. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे प्रथमच होणारे आयोजन आणि त्यातून दिला जाणारा पर्यावरण रक्षण व आरोग्याचा संदेश नागरिकांना आवडल्याचे त्यांच्या प्रतिक्रीयेवरून दिसून आले. तरुणाईला स्पर्धेमुळे मिळत असलेली प्रेरणाही त्यांच्या प्रतिसादातून आणि बोलण्यातून व्यक्त झाली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक केले. फैजान अन्सारी (मुंबई) म्हणाले, “मी भारतीय म्हणून मुंबईहून पुण्यात आलो आहे. ही स्पर्धा पाहण्यासोबतच खेळाडूंचे मनोबल वाढविणे हा उद्देश आहे. आजच्या तरुण पिढीने निरोगी आयुष्यासाठी सायकलचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे.”

साक्षात छत्रपती शिवाजी महाराज या मातीच्या कणकणात असल्याची अनुभूती इथे आल्यावर होत असल्याचे राजस्थानच्या संतोष वर्मा यांनी पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत सांगितले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत बजाज पुणे ग्रँड टूरचे आयोजन झाले आहे. स्पर्धेच्या मार्गामध्ये महाराजांच्या गडकिल्ल्यांचा समावेश केल्याने त्यांचा ऐतिहासिक वारसा अनुभवता येणार आहे.

स्पर्धेच्या अनुषंगाने करण्यात आलेली रंगरंगोटी, स्वच्छ व सुस्थितीत असलेले रस्ते यामुळे हिंजेवडीसह पुणे परिसराचे सौंदर्य अधिक खुलले आहे. सदृढ समाजनिर्मितीसाठी अशा सायकल स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

हिंजेवडी ग्रामपंचायतीच्यावतीने या स्पर्धेची माहिती देण्यात आली. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली. जगभरातील तंदुरुस्त खेळाडू प्रत्यक्ष पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन भविष्यात उत्तम खेळाडू घडविण्याचे प्रयत्न केले जातील असा विश्वास व्यक्त करून स्थानिक शिक्षिका अश्विनी पवार यांनी अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन पुढेही व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

रमेश मधुरे (माजी सैनिक) यांनी बजाज पुणे ग्रँड टूरचे आयोजन हे पुण्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. नामवंत खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची तसेच स्थानिक सायकलपटूंना प्रेरणा मिळण्याची ही मोठी संधी असल्याचे नमूद करून निरोगी जीवनासाठी सायकलचा वापर ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

स्पर्धेला तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धा मार्गावर सायकलपटूंना प्रोत्साहन देतांना युवकांमध्ये उत्साह दिसत होता. माहेश्वरी भताणे यांनी या स्पर्धेपासून प्रेरणा घेत भविष्यात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत सहभागी होण्याविषयी आत्मविश्वास व्यक्त केला.

जनार्धन शिवरकर खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी पुणेकर म्हणून उपस्थित असल्याचे सांगितले. या स्पर्धेमुळे पुण्याच्या नावलौकीकात भर पडत असल्याबाबत त्यांनी आनंद आणि अभिमानाची भावना व्यक्त केली. तर सुनील डांगमाळी यांनी “पुणेकरांनो, जागे व्हा. सायकलचा वापर केल्यास पर्यावरणाचे जतन होईल, प्रदूषणात घट होईल आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. सायकल चालवा, आजाराला पळवा.” असा पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश दिला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×