Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

Pune RTO Fancy Number Auction 2026 : दिवाळीनिमित्त पुणे आरटीओमध्ये पसंतीच्या MH61 मालिकेतील वाहन क्रमांकांसाठी आगाऊ अर्ज स्वीकारणार

Pune RTO Fancy Number Auction 2026

चारचाकी-दुचाकींसाठी पसंतीचे नंबर मिळवण्याची संधी; पुणे आरटीओचे वेळापत्रक जाहीर

marathinews24.com

पुणे –  Pune RTO Fancy Number Auction 2026 : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची वाढती खरेदी लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी MH61 या संकेतांकांतर्गत (MH61 K 0001) नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून राखून ठेवण्यासाठी चारचाकी व दुचाकी वाहनधारकांकडून स्वतंत्रपणे आगाऊ अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

पुणे शहरातील दोन ठिकाणची ऑटोरिक्षा मीटर तपासणी बंद; दोन ठिकाणी सुविधा सुरू राहणार – सविस्तर बातमी 

चारचाकी वाहनांसाठी पसंतीच्या क्रमांकांचे अर्ज ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत स्वीकारण्यात येतील. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता लिलाव प्रक्रिया होईल. दुचाकी वाहनांसाठी ५ नोव्हेंबर रोजी याच वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील. त्यांचा लिलाव ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहात होणार आहे. दोन्ही लिलावांसाठी डीडी स्वीकारण्याची अंतिम वेळ दुपारी ३.१५ अशी आहे.

अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डची साक्षांकित प्रत आणि विहित शुल्काचा डीडी जोडणे आवश्यक आहे. डीडी ‘R.T.O., Pune’ या नावाने पुण्यातील राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेचा असावा. अर्जदारांनी अचूक मोबाईल क्रमांक नमूद करावा. पुणे आरटीओच्या कार्यक्षेत्रातील पत्त्याचा पुरावा असलेल्या वाहनधारकांनीच अर्ज करावेत. अपूर्ण किंवा चुकीच्या रकमेचे डीडी असलेले अर्ज बाद करण्यात येतील.

लिलावात पसंतीचा क्रमांक न मिळालेल्या अर्जदारांनी मूळ डीडी पाच दिवसांच्या आत कार्यालयातून परत घ्यावा. लिलावानंतर शिल्लक राहिलेले पसंतीचे क्रमांक https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×