Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

पुण्यातील बुलेटराजा कारवाईच्या कचाट्यात

पुण्यातील बुलेटराजा कारवाईच्या कचाट्यात

४५ दुचाकींच्या सायलन्सरवर बुलढोझर चालवला

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात मॉडीफाईड दुचाकींवर वाहतूक विभागासह स्थानिक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेषतः दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये बदल करीत फटाक्यांचा आवाज काढणार्‍या दुचाकीस्वारांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर संबंधितांची वाहने ताब्यात घेउन सायलेन्सर हटाव मोहिम जोरदारपणे राबविली जात आहे. मागील काही दिवसांपासून बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध पोलिसांनी कारवाईचा कठोर बडगा उगारला आहे.

पुण्यात तुषार दामगुडेंविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

बुलेटच्या सायलेन्सरद्वारे फटाक्यांसारखा आवाज काढणार्‍या बेशिस्त चालकांना खराडी पोलिसांनी कारवाईचा दणका दिला आहे. तब्बल ४५ बुलेट जप्त करीत संबंधितांच्या सायलेन्सरवर बुलढोझर चढविला आहे. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात बुलेटराजा जाळ्यात अडकल्यानंतर त्यांच्याकडून दंडवसुलीसह बुलटे दुचाकींचे सायलेन्सर नष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना कर्णकर्कश आवाजातून मुक्तता मिळाली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले असून, अशीच कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.

स्थानिकांची मस्ती, पोलिसांकडून कारवाई

खराडी, चंदननगर परिसरात मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिकांची लोकवस्ती असून, गुंठामंत्र्याच्या मुलांकडून अलिशान मोटारींसह बुलेटची खरेदी केली जाते. त्यानंतर वाहनांमध्ये मॉडीफिकेशन करीत आवाज, हॉर्न, लाईट्स बदलण्यात येतात. आजूबाजूने प्रवास करणारे प्रवाशी, रस्त्यालगत असलेल्या नागरिकांचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले होते. त्यासंदर्भात वाहतूक विभागासह खराडी पोलिसांकडे नागकिरांनी तक्रारी केल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली आहे.

४५ बुलेटराजांना दणका

सायलेंन्सरद्वारे आवाज काढून नागरिकांना मनस्ताप देणार्‍या ४५ बुलेटराजांना खराडी पोलिसांनी दणका दिला आहे. त्यांच्या गाड्यांचे सायलेन्सर काढून घेउन त्यावर बुलढोझर चालवण्यात आला. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक राहूल कोळपे, महेश नाणेकर, नवनाथ वाळके, सचिन पाटील, साहेबराव गुंडाळे, संतोष लवटे, विलास केदारी, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×