Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीची झाडाझडती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीची झाडाझडती

पुणे गुन्हे शाखेकडून कागदपत्रांची तपासणी

marathinews24.com

पुणे – महानगरपालिका मतदानापुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्याशी संबंधित ‘डिझाईन बॉक्स कंपनी कार्यालयाची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने झाडाझडती घेतली. पथकाने मंगळवारी (दि. १३) दुपारच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक संबंधित कार्यालयात दाखल झाले. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, ही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणात करण्यात आली, याचा तपशील मिळू शकला नाही.

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानाकरिता मतदानादिवशी सुट्टी-कामगार उपआयुक्त निखील वाळके – सविस्तर बातमी 

राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, प्रचार तोफा थंडावल्या आहेत. दरम्यान तत्पुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड परिसरात सभेला मार्गदर्शन करत असतानाच त्यांचे राजकीय सल्लागार असलेल्या नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनी कार्यालयावर पुणे गुन्हे शाखेने धाड टाकली. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अरोरा हे पवारांचे राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान पिंक कॅम्पेन’ सारख्या प्रभावी प्रचार मोहिमा राबवल्या होत्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या सल्लागाराच्या संबंधित कंपनीवर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले आहे. पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रचारादरम्यान पवारांनी भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यासोबत पुण्यातील कायदा सुव्यवस्था, कोयता गँग, पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप पदाधिकाऱ्यांची केलेला भ्रष्टाचारावर सडकून टीका केली होती. त्याचप्रार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अजित पवारांनी युतीचा धर्म पाळला नाही, मित्र पक्षविरोधी टीका केल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. दरम्यान, मंगळवारी प्रचार संपल्यावर लगेचच अरोरा यांच्या पुण्यातील कार्यालयात गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेत महत्त्वाची कागदपत्रे तपासासाठी ताब्यात घेतली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×