Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

खासदार मेधा कुलकर्णी यांच्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण

खासदार मेधा कुलकर्णी यांच्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण

राहुल डंबाळे यांचा आरोप

marathinews24.com

पुणे – शहरातील शनिवारवाडा परिसरात नमाज प्रकरणाच्या निमित्ताने खासदार मेधा कुलकर्णी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या दृष्टिकोनातून यांनी आंदोलन केले. त्याठिकाणी त्यांनी केलेली वक्तव्य पुणे शहराला दंगलीच्या उंबरठ्यावर घेऊन जाणारी आहे. त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी, मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे. यावेळी माजी नगरसेवक ऍड हाजी कपूर पठाण उपस्थित होते.

पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाडा परिसरात १९ ऑक्टोबरला यापूर्वी नमाज अदा केल्याचा दावा केला होता. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या समवेत परवानगी न घेता शनिवारवाड्यात घुसून आंदोलन केले. पोलिसांचे आदेश न जुमानता त्यांनी शुद्धीकरणाचा घाट घातला. खासदार म्हणून त्यांची ही बाब अत्यंत अशोभनीय आहे. घटनेच्या अनुषंगाने त्यांनी केलेली वक्तव्य ही धार्मिक तेढ निर्माण करणारी आहेत. दंगलीला प्रोत्साहन देणारी असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्यावतीने करण्यात आली आहे

कुलकर्णी यांनी यापूर्वी अशाच प्रकारे कसबा पेठ येथील छोटा शेख सालाउद्दीन दर्गा येथे कृती केली होती.. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारची कृती ही शहराची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई न केल्यास मुंबई उच्च न्यायालयामध्ये विशेष जनहित याचिका दाखल करून न्याय मिळवला जाईल, अशी स्पष्ट भूमिका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्यावतीने घेतली आहे. दरम्यान, हिंदू मुस्लिम ऐक्य साधनाऐवजी धार्मिक ध्रुवीकरण करून शहराला वेठीस धरणे मेधा कुलकर्णी यांच्यासारख्या सुसंस्कृत राज्य कर्त्यांकडून अपेक्षित नाही. घटनेमुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या असून यावर कारवाईची मागणी करत असल्याचे ऍड गफूर पठाण यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×