Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला; जुन्या वादातून मारहाण

रस्ता काँक्रिटीकरण करणार्‍या मजुरावर वार

राजमाता भुयारी मार्गाजवळील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील कात्रज ते नवले ब्रिज दरम्यान असलेल्या राजमाता भुयारी मार्गाजवळ रविवारी सकाळी रिक्षा चालकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर चौकात सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुरज माणिक काळे (वय ३०, रा. जैन मंदिराजवळ, कात्रज, पुणे) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे.

पुण्यात एकाच दिवसांत दोन खूनाच्या घटनांनी खळबळ – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षात प्रवासी भरण्याच्या कारणावरून दोन ते तीन वर्षांपूर्वी जुन्या वादाच्या रागातून आरोपी बापू भोसले, गणेश गोरे आणि गणेश धरपाळे या तिघांनी सुरज काळे यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षा चालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केले आहे. आरोपींच्या शोधासाठी भोर आणि वेल्हा परिसरातही पोलिसांची पथके पाठवली आहेत. प्रकरणाचा तपास आंबेगाव पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×