Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

आशाताई शिंदे-गायकवाड यांना ‘संविधान सन्मान साहित्य पुरस्कार’

आशाताई शिंदे-गायकवाड यांना 'संविधान सन्मान साहित्य पुरस्कार'

८ ऑगस्ट रोजी होणार सन्मान

marathinews24.com

पुणे – विश्वबंधुता साहित्य परिषद, विश्वबंधुता काव्यमंच आणि काषाय प्रकाशन या संस्थांच्या वतीने क्रांती दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित तिरंगा महोत्सवात दिला जाणारा ‘संविधान सन्मान साहित्य पुरस्कार’ यंदा प्रसिद्ध गीतकार आशाताई शिंदे-गायकवाड यांना जाहीर झाला आहे. शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता पत्रकारभवन, नवी पेठ, पुणे येथे होणाऱ्या महोत्सवात तिरंगा महावस्त्र, संविधान राष्ट्रग्रंथ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.

गोपनीय माहितीच्या सुरक्षिततेचे भविष्यामध्ये सायबर क्षेत्रापुढे आव्हान सायबर क्षेत्रातील तज्ञांचे मत – सविस्तर बातमी 

“महोत्सवात ज्येष्ठ साहित्यिका ऍड. प्रार्थना सदावर्ते यांच्या हस्ते कादंबरीकार प्रा. शंकर आथरे यांच्या ‘वाणी विश्वबंधुतेची’ या भाषण संग्रहाचे प्रकाशन होईल. ‘विश्वबंधुतेची पहाट’ काव्यसंमेलनात २५ निमंत्रित कवी सहभागी होतील. स्वागताध्यक्ष डॉ. बंडोपंत कांबळे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, कवयित्री संगीता झिंजुर्के, प्रकाशक मंदाकिनी रोकडे यांचा विशेष सहभाग असणार असून, काही निवडक साहित्यिकांना ‘विश्वबंधुता प्रकाशदूत साहित्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे,” असे प्रकाश रोकडे यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×