Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

संगीता ठोंबरेंनी हाती घेतला ‘धनुष्यबाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी राजकीय प्रवासातील तिसरे स्टेशन गाठले आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठोंबरे यांनी दि १८ जानेवारीला शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ मध्ये भाजपच्या लाटेत विजयी होऊन आमदारकी भूषवली होती. मात्र, २०१९ मध्ये उमेदवारी हुकल्यापासून त्यांनी सुरू केलेला ‘पक्षांतराचा’ प्रवास आता शिवसेनेच्या दारात येऊन थांबला आहे. जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ठोंबरे यांनी ही राजकीय खेळी खेळल्याची चर्चा जिल्हाभरात आहे.

रुग्णांवर वेळेत उपचारासाठी तातडीने उपाययोजना करा खासदार- बजरंग सोनवणे – सविस्तर बातमी

भाजपने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पत्ता कापला होता. त्यानंतर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र निवडणुकानंतर राष्ट्रवादी पक्षात त्या कधी सक्रिय दिसल्या नाहीत. परंतु आता राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी सत्तेशिवाय राहणे त्यांना काहीसे जड जात असल्याचे दिसून आले आहे. महायुतीमध्ये केज विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून केज मतदारसंघाचे आमदार नमिता मुंदडा आहेत. भाजप आणि शिवसेना यांची युती असल्याने ठोंबरे यांना येत्या काळात विधानसभा लढवण्याची संधी मिळणे अशक्य आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागले आहेत. त्यामुळे त्यांनी आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठी जबाबदारी मिळविण्याच्या उद्देशाने सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाची वाट धरली असल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठोंबरे यांच्या केज येथील सूतगिरणीचा पुढील मार्ग सुकर होणार असल्याचीही चर्चा आहे.

मंत्री संजय शिरसाट यांनी प्रथमच बीड जिल्ह्यातील माजी आमदार शिवसेनेशी जोडले गेल्याचे सांगत ठोंबरे यांच्या निवडीचे स्वागत केले. ठोंबरे यांच्यासोबत सरपंच किशोर थोरात, भगवान सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय बापू केंद्रे, अशोक सक्राते, अरविंद चाळक, उमेश चाळक यांच्यासह केज मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सोहळ्याला शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, अनिल जगताप, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, धाराशिवचे शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×