कोट्यावधींची गंडा घालणाऱ्या सौरभ कुलकर्णीला ७ दिवसांची पोलीस कोठडी

कोट्यावधींची गंडा घालणाऱ्या सौरभ कुलकर्णीला ७ दिवसांची पोलीस कोठडी

धारूर न्यायालयाचा आदेश

marathinews24.com

बीड – वैद्यकीय शिक्षणातील मॅनेजमेंट कोट्यातून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह गुजरात, चंदीगड, पंजाब तसेच इतर राज्यांतील अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या सौरभ कुलकर्णी याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

खूनातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार – सविस्तर बातमी 

कुलकर्णी याला धारूर येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना तसेच डॉक्टरांना उच्च व पदव्युत्तर शिक्षणासाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे भासवून आरोपीने विविध राज्यांतील विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी केज विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सय्यद कराडकर, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार , अनिल मंदे यांच्या पथकाने दि. १३ जानेवारीला कराड येथून सौरभ कुलकर्णी याला अटक केली होती. फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेल्या आणखी पीडितांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×