Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

तब्बल ८० लाखांच्या घोटाळा, आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल

तब्बल ८० लाखांच्या घोटाळा, आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल

शिवाजीनगर न्यायालयात ७ जणांविरूद्ध दोषारोपपत्र

marathinews24.com

पुणे – नियमित कंपनीला मालाची विक्री न करता पदाचा गैरवापर करत सातजणांनी मिळून ‘सॉफ्टहार्ट ऑटोमेशन प्रा. लि. कंपनीची ८० लाखांना फसवणूक केली आहे. संबंधित ७ आरोपींविरोधात सहकारनगर पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयात नुकतेच दोषारोपपत्र दाखल केले आहे. फसवणूक करणार्‍या टोळीतील प्रमुख आरोपी मूळचे पणदरे (ता. बारामती) येथील असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत.

दुकानातून टायर चोरणारा गजाआड – हडपसर, लष्कर, भारती विद्यापीठ परिसरातील गुन्हे उघड – सविस्तर बातमी 

सॉफ्टहार्ट ऑटोमेशन कंपनीच्या विक्री विभागातील माधव कल्याण जगताप (वय ३६), धनश्री माधव जगताप (वय ३३, दोघेही रा. मूळ पणदरे बारामती, सध्या रा. जय शंकर अपार्टमेंट, आंबेगाव पठार), राहुल अनिल सुलाखे (रा. साई अंगण सोसायटी, इंद्रायणीनगर), प्रशांत जयराम जगताप (वय ३५, रा. गोकुळनगर, कात्रज), पूजा सचिन जगताप (वय ३४, रा. कात्रज-कोंढवा रस्ता), मीनाक्षी कदम, धर्मेंद्र रामचंद्र सुतार (वय ४७, रा. वाहगाव, कराड) यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. अशोक विठोबा वर्षे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २०१८ ते २०२२ कालावधीत अपहाराचा गुन्हा घडला असून, अर्जानुसार मार्च २०२४ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर जून २०२५ मध्ये आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले.

पोलिसांनी केलेल्या तपासात, आरोपी माधव कल्याण जगताप, कंपनीचे यापूर्वीचे कामगार राहुल अनिल सुलाखे, पूजा जगताप, मीनाक्षी कदम व धर्मेंद्र सुतार यांनी पदाचा गैरवापर करून अपहार केला.’सॉफ्टहार्ट ऑटोमेशन कंपनी प्रा. लि. कंपनीच्या मालाची नामांकित कंपनीला विक्री न करता, अन्य कंपन्यांना परस्पर विक्री केली. त्यातून मिळालेली ७९ लाख १० हजार ४९९ इतकी रक्कम कंपनीच्या खात्यावर न भरता माधव जगताप याने स्वतः, पत्नी धनश्री जगताप व मित्र प्रशांत जगताप यांच्या खात्यावर जमा वर्ग करू घेत फसवणूक केली. बनावट सेल्स ऑर्डर, बनावट बिलिंग, इतर कंपन्यांना माल विक्री, कंपनी इआरपी टॅलीमध्ये नोंदी न करता हे पैसे स्वतःच्या नातेवाईकांच्या खात्यात वळवले.

प्रमुख आरोपी माधव जगताप याने घेतला गैरफायदा आरोपी माधव जगताप सॉफ्ट हार्ड ऑटोमेशन प्रा. लि. कंपनीत २००८ ते २०२२ दरम्यान सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. कंपनीतील कामाची सर्व माहिती व अधिकार त्याच्याकडे होते. त्याने संगनमताने इतर सहकार्‍यांसह कंपनीचा इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनलसारखा माल चुकीच्या पद्धतीने बाहेरच्या ग्राहकांना विकला. वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये चौकशी केली असता, अनेक प्रकरणांत माधवने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधिकाराचा गैरवापर करून कंपनीच्या तत्कालीन कर्मचार्‍यांसह वरिष्ठांनी संगनमताने गुन्हा केला आहे. याप्रकरणी तक्रारी अर्जानुसार मार्च २०२४ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. अनेक बाबींच्या तपासानंतर जून २०२५ मध्ये आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. राहूल गौड, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×