Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

जागतिक आयात शुल्क बदलाचे निर्यातक्षम उद्योगांवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चासत्र संपन्न

जागतिक आयात शुल्क बदलाचे निर्यातक्षम उद्योगांवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चासत्र संपन्न

दागिने, लघुउद्योग, निर्यातदार युनिट्सना करसवलती व प्रक्रियेत सुलभता देण्यावर भर

marathinews24.com

पुणे – जागतिक आयात शुल्क बदलांचा राज्याच्या निर्यातक्षम उद्योगांवर होणाऱ्या परिणामांबाबत अभ्यास करुन उपाययोजना सुचविण्यासाठी विभागस्तरीय समिती आणि जिल्हा, विभागातील विविध उत्पादने निर्यात करणारे उपक्रम, औद्योगिक संघटना, उद्योजक यांचे चर्चासत्र जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आले. यावेळी केंद्रीय संरक्षण विभागाचे प्रमूख सल्लागार अपूर्व चंद्रा, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी,विदेश व्यापार संचालनालयाचे सहसंचालक बी. एन. विश्वास, सांगलीचे अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, पुणे विभागाचे उद्योग सह संचालक संदीप रोकडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा लोणी पाटी येथे संपन्न – सविस्तर बातमी 

राज्यातील उद्योजकांद्वारे निर्मित विविध उत्पादनांचे निर्यात उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, करसवलती आणि विविध शासकीय सवलती देण्याची मागणी उद्योग प्रतिनिधींनी केली आहे. दागिने तसेच इतर निर्यातदार युनिट्सना मुद्रांक शुल्कामध्ये (स्टॅम्प ड्युटी) सवलत मिळावी, किमान १५ वर्षांसाठी वीज करमाफी जाहीर करावी, मंजूर उपकरामुळे लहान उद्योगांवर पडणारा ताण कमी करावा, अग्निशमन विभागाकडून मिळणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्राकरिता आकारले जाणारे शुल्क कमी करावे, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘Consent to Establish’ व ‘Consent to Operate’ या परवानग्यांसाठी मागविण्यात येणाऱ्या बँक हमीवरही पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले. विद्यमान युनिट्सनादेखील एफआयईओमार्फत आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा उद्योगांकडून व्यक्त झाली.

उद्योगांच्या वाढीसाठी हरित ऊर्जा धोरण राबविणे, निर्यात प्रोत्साहनासाठी विशेष सवलती जाहीर करणे, बहुविध वाहतूक उद्याने उभारणे, निर्यातदारांना कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध करून देणे व निर्यात प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या खर्चाची भरपाई शासनाने करावी, या मागण्यांचाही बैठकीत समावेश होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×