Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

Senior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

Senior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

सेवा संकल्प अभियानांतर्गत विश्रांतवाडीतील सामाजिक न्याय भवन येथे सुमारे ३०० ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी

marathinews24.com

पुणे – Senior Citizen Health Camp  : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व सेवा संकल्प अभियानाच्या औचित्याने समाज कल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी समाज कल्याण कार्यालय तत्पर राहील.

सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळ – सविस्तर बातमी 

ज्येष्ठ नागरिकांमधील उत्साह आनंद सामाजिक कार्याची ओढ आदी बाबी वाखाणण्यासारख्या आहेत. ज्येष्ठ नागरिक व तरुण पुढील यातील विसंवाद दूर करून एकमेकांना समजून घेऊन आपापसातील चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले. Senior Citizen Health Camp  यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या पाटस, बारामती, शिरूर, पुरंदर, जुन्नर, लोणावळा, भोर वडगाव शेरी येथील बिगर सहकारी संस्था, ज्येष्ठ नागरिक नागरिक संघ,निवारा वृद्धाश्रम मातोश्री वृद्धाश्रम, महिला वृद्धाश्रम येथील ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला.

दोन पिढ्यांमध्ये सुसंवाद, विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व युवा पिढी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला समाजकल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी व सुमारे ३०० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×