‘सीएमए’ विद्यार्थी व सदस्यांसाठी स्वतंत्र ‘हेल्पडेस्क’ची सुविधा

सीएमए टीसीए श्रीनिवासा प्रसाद यांची माहिती; ‘आयसीएमएआय’तर्फे केंद्रीय व विभागीय पदाधिकाऱ्यांचा सत्कार

marathinews24.com

पुणे – “कॉस्ट अँड मॅनेजमेंट (सीएमए) क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी असून, विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमाकडे कल वाढला आहे. दिवसेंदिवस सीएमए करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या व सदस्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संस्थेच्या वतीने स्वतंत्र हेल्पडेस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबरोबरच प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता व सुलभता आणली जात आहे,” अशी माहिती दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे (आयसीएमएआय) राष्ट्रीय अध्यक्ष सीएमए टीसीए श्रीनिवासा प्रसाद यांनी केले. सीएमए व्यवसायाच्या सक्षमीकरणासाठी संस्थेचे नेतृत्व आणि सदस्य यांच्यातील सातत्यपूर्ण संवाद, ज्ञानविनिमय आणि कौशल्यवृद्धी महत्त्वाची ठरते, असेही त्यांनी नमूद केले.

मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्द – सविस्तर बातमी

दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएमएआय) पुणे चॅप्टरच्या वतीने केंद्रीय व विभागीय समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार व संवाद सोहळ्यात श्रीनिवासा प्रसाद बोलत होते. कर्वेनगर येथील सीएमए भवनात झालेल्या कार्यक्रमावेळी ‘आयसीएमएआय’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सीएमए नीरज जोशी, केंद्रीय समिती सदस्य सीएमए नवनीत जैन, सीएमए आशिष थत्ते, पश्चिम विभागीय समितीचे सचिव सीएमए चैतन्य मोहरीर, उपाध्यक्ष सीएमए नॅन्टी शाह, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए श्रीकांत ईप्पलपल्ली, उपाध्यक्ष सीएमए राहुल चिंचोळकर, सचिव सीएमए हिमांशू दवे, खजिनदार सीएमए तनुजा मंत्रवादी, ‘आयसीएमएआय’चे माजी अध्यक्ष सीएमए डाॅ. धनंजय जोशी, पुणे चॅप्टरचे सल्लागार सीएमए डाॅ. संजय भार्गवे यांच्यासह सीएमए सदस्य उपस्थित होते.

सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली यांनी स्वागत-प्रास्ताविकात चॅप्टरतर्फे राबविण्यात आलेल्या विविध व्यावसायिक आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांची माहिती दिली. सेमिनार, कार्यशाळा आणि विद्यार्थी विकास कार्यक्रमांमुळे संस्थेची, तसेच पुणे चॅप्टरची प्रतिमा आणि ओळख अधिक बळकट झाली आहे. हीरक महोत्सवी वर्षात संस्थेने सदस्य व विद्यार्थ्यांसाठी राबविलेले उपक्रम महत्वपूर्ण ठरले असून, हा प्रवास अभिमानास्पद आहे.

सीएमए नीरज जोशी यांनी ‘आयसीएमएआय’चे मुख्यालय कोलकाता येथून दिल्ली येथे स्थलांतरित झाल्यानंतर संस्थेच्या कामकाजाच्या गतीत झालेल्या वाढीबाबत माहिती दिली. यामुळे शासकीय कार्यालयांशी तातडीने संपर्क साधणे अधिक सुलभ झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. हे सत्र सदस्यांना संस्थेच्या नेतृत्वाशी संवाद साधण्यासाठी, भावी दिशा समजून घेण्यासाठी आणि सीएमए व्यवसायाच्या प्रगतीसाठी आपली बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

सीएमए आशिष थत्ते यांनी श्रीनिवासा प्रसाद व नीरज जोशी यांच्या कुशल व सक्षम नेतृत्वामुळे प्रशासकीय नियंत्रण अधिक प्रभावी झाले असून, कार्यक्षेत्रात नव्या संधींचा शोध घेण्यासाठी अधिक स्वातंत्र्य मिळाल्याचे सांगितले. सीएमए नवनीत जैन यांनी सहकारी क्षेत्रातील अलीकडील घडामोडींविषयी तसेच सहकारी बँकिंग क्षेत्रातील अद्ययावत माहिती दिली. तसेच या क्षेत्रात सीएमए व्यावसायिकांची वाढती भूमिका अधोरेखित केली. सीएमए चैतन्य मोहरीर आणि सीएमए नॅन्टी शाह यांनी वेस्टर्न इंडिया रीजनल कौन्सिलच्या उपक्रमांची माहिती दिली.

या संवाद सत्राच्या शेवटी प्रश्नोत्तरे झाली. केंद्रीय व विभागीय पदाधिकाऱ्यांनी सीएमए सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकाचे समाधानकारक निरसन केले. सीएमए तनुजा मंत्रवादी यांनी सूत्रसंचालन केले. सीएमए हिमांशू दवे यांनी आभार मानले. तत्पूर्वी, एआय ट्रेनर सीएमए देवदत्त केकतपुरे यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर व्याख्यान झाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×