Breking News
Mahatma Jyotirao Phule : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्याचे आवाहनKharadi Bypass Robbery Case : पादचारी जेष्ठेच्या अंगावर पाणी उडवून लुटलेLost Mobile Recovery : वाघोली पोलिसांनी तक्रादारांच्या चेहर्‍यावर फुलवले हसूPune Crime News : पुण्यात पार्किंगच्या वादातून हाणामारीच्या घटनाBopdev Ghat Car Accident : बोपदेव घाटात वाहनाच्या धडकेत मोटार दरीत कोसळलीSugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्याSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रम

Seva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून भोर नगरपरिषदेचा आरोग्य व स्वच्छतेचा जागर

Seva Sankalp Abhiyan

कचरा वर्गीकरण, होम कंपोस्टिंग आणि नदीघाट स्वच्छतेतून नागरिकांमध्ये जनजागृती

marathinews24.com

पुणे – Seva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानांतर्गत भोर नगरपरिषदेच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याबरोबरच स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी कळविली आहे.

सेवा हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह कामकाजासाठी एआयचा प्रभावीपणे वापर करा- राज्य आयुक्त सुधाकर तेलंग – सविस्तर बातमी 

Seva Sankalp Abhiyan अभियानांतर्गत शहरातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तसेच नागरिकांसाठी शहरातील चार ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये नागरिकांसोबतच नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली.

दरम्यान, ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नदी घाट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ व निर्मळ ठेवण्याचा संदेश देण्यात आला. याशिवाय अभियानाच्या माध्यमातून कचरा वर्गीकरण आणि घरगुती कंपोस्टिंग (होम कंपोस्ट) याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी घरोघरी भेटी देत ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्व, घरच्या घरी सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करण्याची पद्धत आणि स्वच्छ शहरासाठी नागरिकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.

आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन या तिन्ही बाबींना केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला असून, स्वच्छ आणि निरोगी भोरच्या निर्मितीसाठी नगरपरिषदेच्या प्रयत्नांना नागरिकांचा सहभाग लाभत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×