रायगडावरील वाघ्याची सुरक्षा वाढवण्याची मागणी, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका
Marathinews24.com
पुणे – ब्राह्मण द्वेषापोटी संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघ नवनवीन वाद उकरून काढत आहेत. सध्या अडीचशे रुपयांचे जाकीट घालून नवनवीन इतिहास अभ्यासक राज्यभर फिरत आहेत. ते फक्त शरद पवार यांच्याशी सुसंगत अशी भुमीका मांडतात. त्यामुळे शरद पवार यांनी इतर इतिहास अभ्यासक पुढे करण्यापेक्षा स्वत:च इतिहास लिहावा. त्यांना अपेक्षित असे हवे ते करावे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार पडळकर बोलत होते.
पुण्यात ५० हजार धनगरी ढोल वाजणार; जागतिक विक्रम होणार – सविस्तर बातमी
आमदार पडळकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासामध्ये होळकर घराण्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे होळकरांच्या पुढाकाराने रायगडावर उभारलेल्या वाघ्या श्वानाच्या समाधीप्रति धनगर समाजाची आस्था आहे. संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघाचे लोक ब्राह्मण समाजाला लक्ष करण्यासाठी जाणून बुजून वाद उकरून काढतात. जात पाहून इतिहास काढण्याची पद्धत २०१४ पासून सुरू झाली आहे. शरद पवार यांना फॉर भुमीका असलेले लोक अडीचशे रुपयाचे जाकीट घालून इतिहास अभ्यासक म्हणवून घेतात. शरद पवारांचा संपूर्ण पक्ष आता अजित पवारांकडे आला आहे. त्यामुळे शरद पवारांकडे मोकळा वेळ आहे. या वेळात पवार यांनी स्वत: इतिहास लिहावा.
वाघ्याच्या स्मारकाची सुरक्षा वाढवावी
खासदार छत्रपती उदयनराजे यांनीही वाघ्याच्या स्मारकास विरोध केला आहे. तेही शरद पवारांना फॉर भुमीका घेत आहेत का, या प्रश्नावर मात्र पडळकर यांनी सावध भुमीका मांडली. ते म्हणाले, उदयनराजे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. याबाबत सामंजस्याने भुमीका घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठरले आहे. सरकारने वाघ्याच्या स्मारकाची सुरक्षा वाढवावी आणि इतिहास अभ्यास संजय सोनावणी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, अशी मागणीही आ. पडळकर यांनी केली.
स्पर्धा परीक्षेत नवीन पुढारी तयार झाले
एमपीएससी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मी सोडलेला नाही. मात्र विद्यार्थ्यांमध्ये नवीन पुढारी तयार झाले आहेत. ते माझ्याकडे आले तरच मी त्यांना घेवून मुख्यमंत्र्यांकडे जाईन. त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र नवीन पुढारी क्लासेस चालवणार्याच्या इशार्यार काम करतात. त्यामुळे सरकारने यासंदर्भात एक धोरण करावे, असेही आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले