Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

पुण्यात ससून रुग्णालयातील गंभीर प्रश्नांवर शिवसेना आक्रमक

पुण्यात ससून रुग्णालयातील गंभीर प्रश्नांवर शिवसेना आक्रमक

गरीब रुग्णांचा आधारवड ठरलेले ससून सर्वोपचार रुग्णालय बिकट अवस्थेत

marathinews24.com

पुणे – राज्यातील गरीब रुग्णांचा आधारवड ठरलेले ससून सर्वोपचार रुग्णालय बिकट अवस्थेत आहे, असा आरोप करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रुग्णालयातील गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी (दि.२२) शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हाअध्यक्ष (शिव आरोग्यसेना) रमेश क्षीरसागर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार व अधीक्षक यल्लाप्पा जाधव यांना निवेदन दिले.

सिंहगड रोडवर साकारतेय भव्य नेत्र रुग्णालय – सविस्तर बातमी 

तातडीने उपाययोजना करा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आक्रोश आंदोलन उभारेल, असा इशारा दिला. औषधांची अनुपलब्धता व रुग्णांना बाहेरून औषधे आणण्याची सक्ती, निवासी डॉक्टरांच्या तक्रारी न सोडवणे, रुग्णालयातील अस्वच्छता, दुर्गंधी व मेडिकल वेस्ट व्यवस्थापनाचा अभाव, शौचालयांची बिकट अवस्था व नातेवाईकांसाठी सुविधांचा अभाव, पोस्टमार्टमला होणारा प्रचंड विलंब व नातेवाईकांकडून वस्तू/पैशांची मागणी, सुरक्षारक्षकांची लाचखोरी व रुग्ण नातेवाईकांशी अरेरावी, आयसीयू बेडची कमतरता, ज्यामुळे गरीब रुग्णांचे जीव धोक्यात आहे. यासोबतच प्रत्येक वॉर्डात २४ तास वॉर्डबॉयची नेमणूक, दान केलेल्या 4 रुग्णवाहिका तातडीने सुरू करणे, ईमर्जन्सी वॉर्ड क्रमांक ४० येथे कायम वॉर्डबॉयची तैनाती, शवागार परिसराचे सुशोभीकरण व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली.

शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, जनतेच्या जिवाशी थेट संबंधित असलेल्या या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास शिवसेना जनतेसह रस्त्यावर उतरून आक्रोश आंदोलन करणार आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी रुग्णालय प्रशासनावर राहील. यावेळी उपशहरप्रमुख प्रशांत राणे, आबा निकम, संघटक राजेंद्र शिंदे, जावेद खान, विधानसभा प्रमुख उत्तम भुजबळ, राजेश मोरे, अनंत घरत, पराग थोरात, दत्तात्रय घुले, अमर मारटकर, मुंकूद्र चव्हाण, बाळासाहेब मोडक, नागेश खडके, जुबेर शेख, राहुल शेडगे, उत्तम भुजबळ, शैलेश जगताप, अशिष आठळ, रहीम शेख, अनिल दामजी, मुरलीधर विलकर, सुनील रासकोडा, परवेश राव, प्रविण डोंगरे, पदमा सरोटे, सुरज खंडाळे, रोहन गायकवाड, निलेश वाघमारे, स्वप्नील जोगदंड, जितु जठार, विजय पालवे, अनिल परदेशी, गिरीश गायकवाड, मोहन पांढरे, मनोज वासु, अजय परदेशा, ओंकार मारण, महिला आघाडीच्या रोहिणी कोल्हाळ , अल्पना मोरे, अमृत पठार, सोनाली जुनवणे, सवीता गोसावी, नाझ इनामदार, जयश्री वैद्य, उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×