Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्यभिषेक दिन साजरा

अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्यभिषेक दिन साजरा

 अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे ‘शिवराज्याभिषेक दिन’ साजरा

marathinews24.com

बारामती – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळेगाव बु. येथे ‘शिवराज्याभिषेक दिन’ साजरा करण्यात आला.

क्रेडाईकडून पारदर्शक व पथदर्शी काम व्हावे -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – सविस्तर बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांची शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश देणारी चित्रफीत दाखविण्यात आली.

अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्यभिषेक दिन साजरा

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शिवराज्याभिषेक दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, डॉ. राहुल मुनगीकर, संस्था व्यवस्थापन समिती सदस्य वैभव सोलणकर, किशोर जोशी, राजेश लोंडे आदी उपस्थित होते. नावडकर यांनी शिवछत्रपतींच्या कार्याचा गौरव करुन ते पुढे म्हणाले, थोर पुरुषांचे विचार तरुणांपर्यंत पोहोविण्याची गरज आहे. या विचारातून विचार अंगीकरण्याच्यादृष्टीने थोर महापुरुषांच्या जयंती व इतर कार्यक्रम आयोजित करावे, असेही ते म्हणाले.

यावेळी डॉ. राहुल मुनगीकर यांनी आपल्या भाषणातून युवकांना शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी ‘पर्यावरण संरक्षण’ या विषयासोबतच कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य व शिष्टाचार, स्वदेशी विचारांचा प्रसार या पंचसुत्रीवर मार्गदर्शन केले.

सोलणकर म्हणाले, सामाजिक एकता व नेतृत्वगुणांच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे,असे ते म्हणाले. यावेळी जोशी, लोंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. संतोष सपकळ यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत जाधव यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×