Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

धक्कादायक बेपता जीएसटी अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला

धक्कादायक बेपता जीएसटी अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला

रात्री पत्नीने दिली होती मिसिंगची तक्रार, आत्महत्या की घातपात ?

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – शासकीय विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा पालीजवळ गाडीमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . संबंधित शासकीय अधिकाऱ्याने आत्महत्या केली की त्याचा घातपात करण्यात आला असा सवाल उपस्थित केला जात आहे.घटनास्थळी ग्रामीण पोलीसांनी धाव घेवून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. सचिन नारायण जाधवर (वय-३५) असे मृत झालेले अधिकाऱ्यांचे नाव आहे.

केज बसस्थानकातून पत्रकाराची दुचाकी चोरीला – सविस्तर बातमी 

संबंधित जाधवर हे बेपत्ता झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.१६) रात्री नोंदवण्यात आली होती. बीडच्या राज्य कर विभागामध्ये ते अधिकारी म्हणून कार्यरत होते. १६ जानेवारी रात्री पासून ते बेपत्ता होते. शनिवारी ( दि.१७) दुपारी एकच्या सुमारास पाली जवळ चारचाकी गाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना मिळाली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे . अधिकाऱ्याने आत्महत्या केली की त्याचा घातपात करण्यात आला हे मात्र स्पष्ट झाले नाही . शवविच्छेदनानंतर मृत्यू झाल्याचे कारण समोर येईल. सचिन जाधवर हे २०१२ च्या बॅचचे अधिकारी असून ते एक लेखक आणि प्रसिद्ध मार्गदर्शक म्हणूनही परिचित होते. त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×