Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

वैमनस्यातून भावंडांवर हल्ला; खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

शेतजमिनीतील रस्त्याच्या वादातून भावंडांवर हल्ला

मार्केट यार्ड पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून भावंडांवर दोघांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मार्केट यार्ड भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आशुतोष नाना क्षीरसागर (वय २७), ऋषीकेश नाना क्षीरसागर (वय २६, दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आरमान समीर शेख (वय २५), शाहरुख उर्फ कल्लू शेख (वय २७, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आशुतोष याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वैमनस्यातून भावंडांवर हल्ला; खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष आणि ऋषीकेश यांच्या नातेवाईकांचे २६ जुलै राेजी निधन झाले. दोघे जण अंत्यविधीसाठी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मार्केट यार्डातील डाॅ. आंबेडकरनगर परिसरातून निघाले होते. त्या वेळी आरोपींनी दोघांना अडवले. वैमनस्यातून आरोपींनी आशुतोष आणि ऋषीकेश यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी तपास करत आहेत.

हडपसरमध्ये काका-पुतण्याचा खुनाचा प्रयत्न

हडपसर भागात दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या टोळक्याने काका पुतण्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सूरज रामा माने (वय २९, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) आणि त्याचे काका आरोपींनी केलेल्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या प्रकरणी कनवरसिंग कालूसिंग टाक, झलकसिंग त्रिलोकसिंग टाक, मंगेशसिंग विजयसिंग जुनी (तिघे रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज माने, त्यांचा चुलत भाऊ अविनाश माने, समाधान माने हे सोमवारी (२७ जुलै) वेताळबाबा वसाहतीत दुपारी गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपीं तेथे दारू पिऊन आले. आरोपी गोंधळ घालत होते. त्यामुळे आरोपींना माने याने जाब विचारला. या कारणावरुन आरोपी चिडले. आरोपींनी सूरज आणि त्याचे काका यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींनी परिसरात दहशत माजविली. सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×