दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे प्रशासनाने घेतला निर्णय
marathinews24.com
पुणे – राज्यासह ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासोबत सिंहगड परिसरात दरड कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांतही अतिवृष्टीचा इशारा दिलेला असून, त्यापार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने सिंहगड किल्ला २९ मे पासून तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय सुरक्षिततेच्यादृष्टीने आयोजित व्याख्यानाकरीता नावे कळविण्याचे आवाहन – सविस्तर बातमी
सिंहगड किल्ला गुरुवार, दिनांक २९ मे पासुन पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने निर्णय लागू करण्यात आला आहे. ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. कल्याण दरवाजा, आतकरवाडी व इतर सर्व पायी मार्ग बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून संभाव्य आपत्ती टाळता येईल असे आवाहन वन विभागाच्या उपवनसंरक्षकांनी केले आहे.