Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

बँक व्हेरिफिकेशनच्या नावाखाली १२ लाखांचा गंडा

अतिरेक्यांकडे मोबाइल क्रमांक सापडल्याची बतावणी

पुणे – बँक खात्याचे व्हेरिफिकेशन करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून तब्बल ११ लाख ८० हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. ही घटना १३ मे रोजी ऑनलाईनरित्या कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय जेष्ठाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहाच्या आमिषाने फसवणूक; युवतीची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक कोथरूडमध्ये राहायला असून, १३ मे रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. बँक खात्याचे व्हेरिफिकेशन करण्याची बतावणी करीत त्यांना एक फाईल पाठविली. त्यामाध्यमातून सायबर चोरट्याने जेष्ठाच्या बँकखात्याचा अ‍ॅक्सेस घेउन ऑनलाईनरित्या ११ लाख ८० हजारांची रक्कम वर्ग करून घेतली. रक्कम वजा झाल्याचा मेसेज आल्यानंतर जेष्ठाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×