Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पर्यावरण दिनानिमित्त ‘वृक्षाथॉन- २०२५ ’चे १ जून रोजी आयोजन

पर्यावरण दिनानिमित्त ‘वृक्षाथॉन- २०२५ ’चे १ जून रोजी आयोजन

वृक्षाथॉन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षाथॉन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

marathinews24.com

पुणे – आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन ५ जूनच्या निमित्ताने पुणे पोलीस, वन विभाग, व पुणे स्थित वृक्षाथॉन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १ जून रोजी ‘वृक्षाथॉन- २०२५’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

माहिती विभाग आणि पत्रकार संघाच्या विद्यमाने विकास पत्रकारिता कार्यशाळा संपन्न – सविस्तर बातमी 

वृक्षाथॉनचे हे ४ थे वर्ष असून या स्पर्धेचा मुख्य उद्देश हा नागरिकांमध्ये वृक्ष लागवड व निसर्ग संवर्धन याबाबत जनजागृती व्हावी असा आहे. या स्पर्धेमध्ये देशभरातून १० हजारावर स्पर्धक सहभागी होणार आहेत. प्रत्येक सहभागी स्पर्धकास वनविभागामार्फत एक झाडाचे रोपटे देऊन त्याचे संवर्धन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा एकूण ३ किमी, ५ किमी, १० किमी व २१ किमी (हाफ मॅरेथॉन) अशा चार प्रकारामध्ये आणि १८ ते ३० वर्षे, ३१ ते ४५, ४६ ते ६० आणि ६१ वर्ष व त्यावरील अशा चार वयोगटामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक सायकल तसेच लाखो रुपयांची पर्यावरणपूरक पारितोषिके असणार आहेत.

या सर्व स्पर्धांची सुरूवात पोलीस मुख्यालय होऊन निश्चित मार्गाने जाऊन परत पोलीस मुख्यालय येथेच शेवट होईल.

२१ कि.मी. अर्धमॅरेथॉनचा प्रारंभ पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे होऊन – चापेकर चौक – ई-स्क्वेअर – चतुश्रुंगी चौक – पाषाण रोड – अभिमान श्री – एनसीएल मंदिर – डिआरडीओ गेट – पाषाण सर्कल – बावधन – चांदणी चौक येथून युटर्न घेऊन परत त्याच मार्गाने पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे शेवट होईल.

प्रत्येक स्पर्धकांस आयोजकांमार्फत टी शर्ट, बीब्ज, गॉडी बॅग, स्नॅक्स, पाण्याची बाटली देण्यात येणार असून मार्गावर ठिकठिकाणी हायड्रेशन पॉईंट लावण्यात येणार आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक तसेच स्पर्धकांच्या मदतीसाठी स्वंयसेवक असणार आहेत.

स्पर्धेच्या दिवशी वाहतूक बदल करण्यात येणार असून पर्यायी वाहतूक मार्गांची माहिती कळविण्यात येईल.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड व महाराष्ट्र तसेच देशभरातील पर्यावरण प्रेमी, नागरिक व धावपटू यांनी या स्पर्धेमध्ये आवर्जून सहभागी होऊन वृक्ष लागवड व निसर्ग संवर्धनासाठी आपला सहभाग नोंदवावा. सदर स्पर्धेकरीता https://www.vrukshathon.com या लिंकवर भेट देऊन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय वन अधिकारी (प्रसिद्धी व माहिती, वने) रेश्मा व्होरकाटे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×