Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

श्री क्षेत्र जोतिबा मंदिराला (कोल्हापूर) सर्वसमावेशक विकास आराखडा प्रशासकीय मान्यता

श्री क्षेत्र जोतिबा मंदिराला (कोल्हापूर) सर्वसमावेशक विकास आराखडा प्रशासकीय मान्यता

आराखड्यासाठी २५९ कोटी ५९ लाख रुपये खर्चास मान्यता

marathinews24.com

मुंबई – लाखो भाविकांचं श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिर (कोल्हापूर) येथील सर्वसमावेशक विकास आराखड्यासाठी २५९ कोटी ५९ लाख रुपये खर्चास नियोजन विभागाच्या माध्यमातून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा शासन निर्णय आज (दि. २८ मे) नियोजन विभागानं जारी केला आहे. या विकास आराखड्यातील अंमलबजावणी व संनियंत्रणाची जबाबदारी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. श्री क्षेत्र जोतिबा हे राज्यातील एक ऐतिहासिक व धार्मिक श्रद्धास्थान असून त्याचा विकास करण्यासाठी शासनानं विविध पातळ्यांवर व्यापक विचार करून आराखडा तयार केला आहे.

पर्यावरण दिनानिमित्त ‘वृक्षाथॉन- २०२५’चे १ जून रोजी आयोजन – सविस्तर बातमी 

विकास आराखड्याअंतर्गत श्री जोतिबा मंदिर संवर्धन व दुरूस्ती करणं, यमाई मंदिर संवर्धन व दुरूस्ती करणं, श्री जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटा संवर्धन व सुशोभीकरण करणं, श्री जोतिबा डोंगर कड्यांचं संवर्धन करणं, देवस्थान समिती/प्राधिकरण नवीन कार्यालय बांधणं, श्री जोतिबा डोंगरावर दोन ठिकाणी ज्योत स्तंभाची निर्मिती करणं, श्री जोतिबा डोंगरावर नवे तळे परिसर विकास करणं, श्री जोतिबा डोंगरावर केदार विजय गार्डन निर्मिती करणं, श्री जोतिबा डोंगरावर यमाई परिसर विकास (चाफेवन) करणं, श्री जोतिबा डोंगरावर कर्पूर तलाव संवर्धन करणं, श्री जोतिबा डोंगरावर चव्हाण तलाव संवर्धन करणं, श्री जोतिबा डोंगरावर मुरलीधर पुष्करणी तलाव संवर्धन करणं, श्री जोतिबा डोंगरावर ऐतिहासिक अंगारकर वाडा व बाब संवर्धन करणं, श्री जोतिबा डोंगरावर वाहनाकरिता पार्किंग व्यवस्था करणं, श्री जोतिबा डोंगरावर पाणपोई व शौचालय बांधणं आदी बाबींचा समावेश आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×