Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

रिक्षावर झाड कोसळून प्रवाशी जेष्ठ महिला ठार

रिक्षावर झाड कोसळून प्रवाशी जेष्ठ महिला ठार

महापालिका प्रशासनासह उद्यान विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह

marathinews24.com

पुणे – रस्त्यालगत असलेल्या पेशवे पार्कमधील गुलमोहराचे झाड पावसामुळे अचानक मोडून रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर कोसळले. या दुर्घटनेत शुभदा यशवंत सप्रे (वय ७६, रा. आनंदनगर, सिंहगड रोड) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सिंहगड रोडवरील नीलायम ब्रिज ते नाशी फडके दरम्यानच्या रस्त्यावर बुधवारी (दि. २८) दुपारी साडे तीन वाजता घडली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटीबद्ध – पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी 

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडे तीन वाजता सप्रे रिक्षातून प्रवास करत होत्या. नीलायम ब्रिज ते नाशी फडके दरम्यानच्या रस्त्यावर गुलमोहर झाड रिक्षावर कोसळले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. रिक्षाचालक संजय अवचरे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघातानंतर नागरिकांनी त्वरीत जखमींना चैतन्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, सप्रे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर गुलमोहर झाड तातडीने हटविण्यात आले असून, पोलिसांनी घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील झाडांची छाटणी आणि देखभाल न केल्यास अशा दुर्घटना घडत आहेत. याप्रकरणी पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

कर्वेनगरमध्ये दुचाकीस्वाराच्या अंगावर झाड कोसळल्याने एकजण ठार

शहरातील कर्वेनगर परिसरात दुर्दैवी घटना घडली असून , अलंकार पोलिस चौकीजवळ रस्त्याच्या कडेला असलेले भले मोठे झाड परिसरातुन जाणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाच्या अंगावर पडले.
त्यामुळे गंभीरपणे जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी (दि.२६) रात्री पावणे आठच्या सुमारास अलंकार पोलीस चौकीजवळ घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल श्रीकांत जोशी ( वय ४९, रा.नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. झाड रस्त्यावर पडल्याने परिसरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिक पोलिसांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार जोशी हे कामावरून सुटल्यावर अलंकार पोलीस चौकीजवळुन जात होते. रात्री पावणे आठच्या सुमारास भले मोठे झाड अचानकपणे जोरात रस्त्यावर कोसळले. झाड इतक्या वेगाने पडले की दुचाकीस्वार जोशी हे झाडाखाली दबले गेले. त्यांच्या सोबत एक मोटरही झाडाखाली अडकली.

आवाजामुळे स्थानिक नागरिकांनी जखमीला मदत करण्यासाठी तत्काळ धाव घेतली. घटनेची माहिती पोलिस, अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांसह अलंकार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. जखमी अवस्थेत तरूणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्याला मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांसह उद्यान विभागाने झाड हटवण्याचे काम हाती घेतले आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरम्यान, धोकादायक झाडे वेळीच हटवण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, हे मोठे झाड कोसळून दुचाकीस्वार ठार झाल्यामुळे महापालिका प्रशासनासह उद्यान विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सध्या पोलीस घटनेचा अधिक तपास करत असून, सार्वजनिक सुरक्षेच्या उपाय योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×