Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

स्वतः च्या गाडीवर घडवून आणला गोळीबार

स्वतः च्या गाडीवर घडवून आणला गोळीबार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुण्यातील पदाधिकार्‍याला अटक; वारजे माळवाडीत १९ मेला, रात्रीची घटना होती घटना

marathinews24.com

पुणे – पोलीस संरक्षण आणि शस्त्र परवाना मिळविण्यासाठी स्वतः च्या गाडीवर गोळीबार घडवून आणण्याऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे जिल्हा युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. त्याने स्वतःच्या मोटारीवर गोळ्या झाडल्याचा कट रचल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. ही घटना १९ मे रोजी बाराच्या सुमारास वारजे माळवाडी भागात घडली होती. निलेश राजेंद्र घारे असे अटक केलेल्याचे नाव आहे.याप्रकरणी सचिन गोळे, शुभम खेमणार आणि अजय उर्फ बगली सकपाळ यांनाही नुकतीच पोलिसांनी अटक केली होती. त्यांचा साथीदार संकेत मातले हा फरार असून वारजे पोलिसांकडून त्याचा शोध घेत आहेत.

वाघोली, हडपसरमध्ये महिलांचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी 

पुणे जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर अज्ञाताने १९ मे रोजी रात्री बाराच्या सुमारास वारजे माळवाडी भागात गोळीबार केला होता. घारे यांचे येथील गणपती माथा परिसरामध्ये जनसंपर्क कार्यालय असून, ते कार्यालयात सहकार्‍यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. सुदैवाने घारे हे गाडीत नसल्याने त्यांना दुखापत झाली नव्हती. याप्रकरणी वारजे पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकांनी तपासाला गती दिली. रविवारी (दि. २५) रात्री उशिरा वारजे पोलिसांनी वारजे भागातून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी हा सगळा प्रकार घडवून आणल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे निलेश घारे यांनीच गोळीबार करायला लावल्याचा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला.

गोळीबार राच्या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी जिल्हाध्यक्ष घारे याला अटक केली आहे. पोलीस संरक्षण मिळावे यासाठी त्यांनीच हा गोळीबार घडवून आणला आहे. स्वत: निलेश घारे यांनी स्वतःच्या गाडीवर गोळीबाराचा डाव रचल्याची माहिती पोलिस तपासातून उघडकीस आली आहे. पोलिस संरक्षण मिळावे आणि शस्त्र परवाना मिळावा यासाठी स्वतःच्या गाडीवर त्यांनीच गोळीबार घडवून आणला असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वारजे पोलिसांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×