Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

विद्यार्थ्यांनी साकारली गणेशाची विविध रूपे

विद्यार्थ्यांनी साकारली गणेशाची विविध रूपे

वृद्धी रिॲलिटी, महापालिका, अस्तित्व फाऊंडेशनचा उपक्रम

marathinews24.com

पुणे – संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, पुणे महापालिका आणि अस्तित्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसेवा ई लर्निंग स्कूलमध्ये आज (दि. २५) आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी गणेशची विविध रूपे साकारली. पाषाण-सूर लिंकरोडवर असलेल्या शाळेतील २०० विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेत, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोषात केला. पर्यावरणपूरक श्रीगणेशाच्या मूर्ती साकारल्या.

महात्मा गांधी-डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते राजगुरु, वि.दा. सावरकर, लोकमान्य टिळक, : महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यसेनानींचा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत केला गौरव – सविस्तर बातमी 

कार्यशाळेचे उद्‌घाटन सुप्रसिद्‌ध शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच दीप प्रज्वलन करून झाले. संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जायभाये, मुख्याध्यापक शाफीमोन पी. एच., संचालक नरहरी पाटील, सिने मॉडेल आर्ट स्टुडिओचे सुरेश राऊत, सातारकर स्टुडिओच्या प्रज्ञा सातारकर मंचावर होते. बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.

विवेक खटावकर यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना नवे काही करण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले. शैक्षणिक उपक्रमांबरोबरच कौशल्य विकासासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरतात, असे मत डॉ. राजश्री जायभाये यांनी व्यक्त केले.

प्रज्ञा सातारकर म्हणाल्या, पर्यावरणपूरक उपक्रमात विद्यार्थ्यांचाही सहभाग असावा या उद्देशाने शाळेत पर्यावरणपूरक शाडू मातीपासून श्रीगणेशाची मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक शाफीमोन पी. एच., शितल लाड, शुभांगी कुलकर्णी, उदय पोटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली गजभिये यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×