Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

“जीवन गौरव” पुरस्काराने सुरेश प्रभुणे सन्मानित

"जीवन गौरव" पुरस्काराने सुरेश प्रभुणे सन्मानित

“व्यावसायिकांसाठी त्यांनी केलेले कार्य दीपस्तंभारखे- सचिन जोशी

marathinews24.com

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुरेश प्रभुणे यांना या वर्षीचा स्टेशनरी, कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशनचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल,पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुण्यातील शुक्रवार पेठेतील नातूबाग गणपती चौक येथील “वरदश्री” सभागृहात ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता संस्थेच्या सभासदांसाठी झालेल्या वार्षिक सभेमध्ये सुरेश प्रभुणे यांना सपत्निक सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सचिन जोशी यांनी सुरेश प्रभुणे, स्नेहल प्रभुणे यांचा सन्मानचिन्ह शाल, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

पुण्यात हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेची बैठक संपन्न – सविस्तर बातमी 

संजय जोशी म्हणाले, पुण्यातील नॅशनल केमिकल्स लॅबोरेटरी मधून २९ वर्षे सेवा केल्यानंतर प्रभुणे सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांचे संघ कार्य चालू आहे. माणसे जोडणारे, सतत कार्यरत,स्पष्ट बोलणारे, असे सुरेश प्रभुणे यांचे व्यक्तिमत्व. अहिल्यादेवी शाळेजवळ छोटेसे दुकानाद्वारे त्यांनी व्यवसाय सुरू केला. निवृत्त झाल्यावर अखेरचे वेतन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यास अर्पण केले. पुण्यातील स्टेशनरी, कटलरी, अँड जनरल मर्चंट्स असोसिएशनच्या कार्यास सुरवातीपासून ते आजपर्यंत सर्व व्यापारी बांधवांना, समाजातील सर्व घटकातील नागरिकांना ते मदत करत असतात. त्यांनी २०१३ व २०१४ ह्या वर्षी संस्थेचे अध्यक्षपदही भूषविले. गेले ४०- ४५ वर्ष ह्या संस्थेबरोबर कार्यरत असून त्यांच्या अध्यक्ष काळामध्ये सभासदांना गुढी पाडवा निमित्ताने शुभेच्छा पत्र तसेच मकरसंक्रांती निमित्त सभासदांना प्रत्यक्ष तिळगुळ देणे, स्नेह मेळावा घेणे, असे उपक्रम लोकप्रिय झाले होते. दिवाळी संपर्क पत्रिका जास्तीत जास्त पानामध्ये काढण्याचा विक्रम करून संस्थेला उत्पन्न मिळवून देणारा उपक्रम अजूनही चालू आहे.

सुरेश प्रभुणे म्हणाले, या संस्थेच्या कार्यास मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रेरणा मिळाली. कै रामभाऊ म्हाळगी यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने मी घडलो. त्यांनी सांगितलेल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर व पायाला भिंगरी” त्रिसूत्री मंत्राने मी आयुष्यभर कार्य केले.१९६० पासून संघाच्या कामात आहे. पू. गोळवलकर गुरुजी, तात्या बापट, बाबाराव भिडे, जगन्नाथराव जोशी, रामभाऊ म्हाळगी यांचे मार्गदर्शन लाभले. बँक ऑफ महाराष्ट्रमधील वरिष्ठ अधिकारी सदानंद भागवत यांच्या मदतीमुळे व्यवसाय यशस्वी करू शकलो. तळजाई शिबिर, हिंजवडी शिबिर, मोतीबाग प्रकल्प अशा अनेक संघाच्या सेवा कार्यात मला प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×