Breking News
Sugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्याSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रमDeposit Fraud : छत्रपती मल्टीस्टेट सोसायटी प्रकरण; ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहनPune Solapur Road Accident : दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यूPune Crime News : सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून चोरीChakan Industrial Area Development : प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून चाकण औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधावाSrinagar Dussehra Celebration : श्रीनगरमध्ये दसऱ्याचा उत्साह; सामाजिक सलोख्याचे दर्शन

सोशल मीडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

राज्यसभा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडून डीपफेक, ‘एआय’निर्मित हिंदू देवी-देवतांच्या प्रतिमा प्रसाराचा मुद्दा उपस्थित

marathinews24.com

नवी दिल्ली – हिंदू देव-देवतांचे एआय-आधारित डीपफेक आणि अश्लील स्वरूपातील चित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. ही गोष्ट अतिशय संतापजनक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे जाणीवपूर्वक अशा गोष्टी पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी राज्यसभेत केली.

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासन मंजूरी-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे – सविस्तर बातमी

खासदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी विशेष उल्लेखाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि मनस्ताप देणारे असल्याचे सांगत त्यांनी यामागे जाणीवपूर्वक धार्मिक भावना भडकवण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हेतू असल्याचा आरोप केला.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, अलीकडच्या काही महिन्यांत अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्सवर एआय-जनरेटेड, मॉर्फ्ड आणि डीपफेक अश्लील चित्रांचा मोठा प्रसार होताना दिसून येत आहे. हिंदू देवतांचे चित्रण खास करून लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रगत एआय-तंत्रज्ञान, डीपफेक टूल्स आणि इमेज मॅनिप्युलेशनच्या दुरुपयोगामुळे सायबर गुन्ह्याचा नवा धोका निर्माण झाला असून, पवित्र प्रतिमा विकृत करून मुक्तपणे प्रसारित केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याच्या कायदेशीर चौकटीत या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी कडक व्यवस्था नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. या कृत्यांच्या पद्धतशीर आणि हेतुपुरस्सर स्वरूपावरून हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.

केंद्र सरकारने या प्रकारातील दोषींवर कठोर आणि आदर्श कारवाई करावी, सोशल मीडिया कंपन्यांना एआय-आधारित शोधयंत्रणा, तत्काळ ‘टेकडाऊन’ प्रणाली आणि संवेदनशील सामग्रीसाठी कठोर पडताळणी प्रक्रिया अनिवार्य कराव्यात, अशी मागणी केली. यासोबतच, ‘हिंदू फेथ प्रोटेक्शन लॉ’ किंवा ‘अँटी-ब्लास्फेमी लॉ’ सारखा सर्वंकष कायदा करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली, ज्याद्वारे एआय-आधारित धार्मिक बदनामी थांबवता येईल.

कुलकर्णी यांनी इशारा दिला की योग्य पातळीवर तातडीची कारवाई झाली नाही, तर डीपफेक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा धोका वाढू शकतो. याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिसाद आलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×