३ जिल्ह्यात माजविली दहशत, टोळीविरूद्ध मोक्का

कुख्यात किरण मोहितेसह टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका

marathinews24.com

पुणे – राज्यातील ३ जिल्ह्यात गुन्हेगारीसह दहशत करुन वर्चस्व प्रस्थापित करणार्‍या कुख्यात गुंड किरण एकनाथ मोहिते याच्यासह टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. टोळीने वडगाव मावळसह पुणे ग्रामीण, सातारा, रायगड जिल्हयामध्ये दहशत निर्माण केली होती. मारामारी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी उकळणे, जबरी चोरी करणे, डॉक्टरांवर हल्ला करणे, कट करुन खंडणी मिळवण्यासाठी खुनाचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न करणे असे ९ गुन्हे दाखल आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी टोळीविरूद्ध मोक्का कारवाईला मंजुरी दिली.

कोंढव्यात दुकानदाराकडे खंडणी मागून तोडफोड; ५ जणांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

किरण एकनाथ मोहिते (वय २६ रा. व्हिजन वुडस, जांभुळ ता. मावळ) एकनाथ अर्जुन मोहिते वय ५३ रा. जांभुळ ता. मावळ, रविंद्र लक्ष्मण मोहिते (वय ३३ रा. कुडेवाडा, वडगाव मावळ) मयुर ऊर्फ चण्या बजरंग मोढवे (वय २६ रा. ढोरेवाडा, वडगाव मावळ ) करण रमेश पवार (वय २५ रा. टाकवे बु ता. मावळ ) सुशांत अनिल साबळे (वय २४ रा. केशवनगर, वडगाव मावळ) अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख किरण मोहिते पसार असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

वडगाव मावळ हददीमधील विवोट्री हॉटेलमध्ये १० नोव्हेंबर २०२४ रोजी कुख्यात किरण मोहिते आणि टोळीने संतोष रामभाऊ साळुंखे यांच्याशी वाद घालुन ‘तुला आता सोडत नाही, तुला दाखवतोच ‘अशी धमकी दिली. शिवीगाळ दमदाटी करुन संतोष्ला जीवे मारण्याचे उददेशाने गळा आवळुन काचेच्या ग्लाससह खुर्च्यानी डोक्यात मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी शाहरुक हनिफ अत्तार (वय ३२ रा. चिखली,पुणे ) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्ह्यात ७ आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी पाचजणांना अटक केली. सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. उपनिरीक्षक आर. आर. मोहिते यांनी ७ आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

टोळीवर पुणे ग्रामीण, सातारा, रायगड जिल्हयामध्ये गर्दी मारामारी करणे हत्याराचा वापर करुन खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी स्वरूपाचे ९ गुन्हे दाखल आहेत. टोळीविरूद्ध मोक्का कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिले होते. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी टोळीविरूद्ध प्रस्ताव सादर केला. त्यानंतर मोहिते टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे करीत आहेत. ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक, रमेश चोपडे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, जावळे, पासलकर, सागर नामदास, तुषार भोईटे, यांनी केली. पोलीस अंमलदार महेश बनकर, अमोल कसबेकर, किरण नांगरे, गणेश होळकर, सिध्दार्थ वाघमारे यांनी प्रस्ताव तयार केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×