Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रंगणार साहसी एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रंगणार साहसी एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा

सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉनचे आयोजन

marathinews24.com

पुणे – भारताच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा किल्ल्यांचे दर्शन घडवण्यासाठी या परिसरात एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा येत्या शनिवारी (दि १३) रंगणार आहे. यंदाचे स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. सिंहगडाच्या पायथ्यापासून ते राजगड सर करून तोरणा किल्ल्यापर्यंत ते लिंगाणा सुळक्याच्या पायथ्यापर्यंत रायलिंग पठार असा मॅरेथॉनचा मार्ग असणार आहे.

पुणे पुस्तक महोत्सवा अंतर्गत ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमात साडेसात लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा विक्रमी सहभाग – सविस्तर बातमी 

भारत, फ्रांस, इंग्लंड, अमेरिका, साऊथ कोरिया, स्वित्झर्लंड, नेदरलॅंड, नॉर्वे, इस्टोनिया या ९ देशातील खेळाडूंसह, भारतातील २४ राज्य आणि ५५ शहरातील एकूण ९५० पेक्षा अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही मॅरेथॉन १०० किमी, ५३ किमी, २५ किमी व ११ किमी अशा वेगवेगळ्या विभागात घेतली जात आहे. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. शर्यतीत सहभागी होण्याऱ्या स्पर्धकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात असून त्याचबरोबर प्रथामिक सोय सुविधांची व्यवस्था केली गेली आहे. विजयी स्पर्धकांना विशेष सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. पश्चिम घाटातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या परिसरात ही १०० किमीची मॅरेथॉन स्पर्धा स्पर्धकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरणारी आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली.

एसआरटीएल अल्ट्रा मॅरेथॉन सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा किल्ल्यांना जोडणारी प्राचीन मार्गाची मॅरेथॉन आहे. स्पर्धेत गोळेवाडी (डोणजे) ते सिंहगड ११ किमी, डोणजे-सिंहगड ते राजगड २५ किमी, डोणजे-तोरणा ५३ किमी आणि डोणजे ते लिंगाणा १०० किमी अशा चार अंतर श्रेणीमध्ये ही स्पर्धा आहे. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन हे इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसियेशनची सदस्य आहे. एसआरटी अल्ट्रा ही स्पर्धा वेळेत पुर्ण करणारया स्पर्धकांना फ्रांस मधील UTMB पात्रतेसाठी अवश्यक गूण मिळतात.

छत्रपती शिवरायांच्या व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंहगड, राजगड, तोरणा आणि लिंगाणा गडकिल्ल्यांच्या सानिध्यातील ही स्पर्धा पुर्वीच्या काळी प्रवास,व्यापार शेतीसाठी वापरलेला हा मार्ग ऐतिहासिक पाऊलखुणांची आठवण करून देणारा आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडासा वेळ काढून स्वतःच्या आरोग्यासाठी व आनंदासाठी वेळ काढणे महत्त्वाचे झाले आहे. एसआरटीएल मॅरेथॉन सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आरोग्य अशा तिन्ही बाबींचा समन्वय साधणारी स्पर्धा आहे. महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग तसेच वन विभाग, पर्यटन विभाग, पुणे पोलीस व पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विशेष सहकार्याने हि स्पर्धा दरवर्षी यशस्वी पार पडते.

८ व्या वर्षीचे विशेष आकर्षण

भारतातील सर्वात अव्वल माउंटन ट्रेल रनर म्हणजे दार्जीलिंगचे हेमंत लिंबू व सोम बहादूर थमी यंदा पुन्हा एकदा विक्रम करायला येत आहेत. त्यांचा विक्रम मोडण्यासाठी पालघरचा प्रसिद्ध धावपट्टू विशाल वालवी व उत्तराखंडचा संजय नेगी हे सुद्धा सज्ज झाला आहे. त्यांच्या बरोबरीने यंदा महिलांच्या श्रेणीमध्ये नविन राष्ट्रीय विक्रम करण्यासाठी राखी राय, समजाना राय, व सून माया लिंबू या ३ महिला दार्जिलिंगच्या धावपट्टू सह्याद्रीमध्ये पहिल्यांदाच येत आहेत. त्यामुळे भारतीय अल्ट्रा ट्रेल रननरमध्ये यंदा कोण किती वेळामध्ये ही मॅरेथॉन पार करणार अशी उत्सुकता निर्माण झालेली आहे.एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष दिग्विजय जेधे, विश्वस्त अनिल पवार, महेश मालुसरे, मंदार मते, ॲड. मारूती गोळे, अमर धुमाळ, ॲड. राजेश सातपुते, तसेच फाउंडेशनच्या ५०० स्वयंसेवकांनी यासाठी अथक परिश्रम केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×