Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांच्या निधनाने स्त्री शक्तीची मोठी हानी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

marathinews24.com

मुंबई – शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या, विधानपरिषदेच्या सदस्य म्हणून निवडून येत शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळविणाऱ्या कै. नीला देसाई यांच्या निधनाने शिवसेनेच्या जुन्या पिढीतील एका महत्त्वाच्या, नेत्या आपण गमावल्या आहेत, अशी भावपूर्ण श्रद्धांजली विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अर्पण केली.

अल्पवयीन पीडितेचा २४ तासात पोलिसांनी लावला शोध – सविस्तर बातमी

कै. नीला देसाई यांचे शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावर बोलताना म्हटले आहे की, “नीलाताईंसोबत माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. दूरध्वनीद्वारे आमचा संपर्क होता. त्या विधानभवनात आल्यावर आमच्या प्रत्यक्ष भेटी होत आणि मग चर्चा व्हायची. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यक्रमांमध्ये आम्ही काही वेळा एकत्र सहभागी झालो होतो.”

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा ठेवणाऱ्या, आक्रमक महिला कार्यकर्त्या म्हणून कै. नीला देसाई यांची ओळख होती. त्यांनी केलेल्या कार्याचा संदर्भ आपण विधानपरिषदेत आपल्या कामकाजात दिल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

“त्यांच्या निधनाने शिवसेनेच्या संघर्षशील आणि अनुभवी नेतृत्वाची मोठी उणीव भासणार आहे. या दुःखद प्रसंगी मी देसाई कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून ईश्वरचरणी प्रार्थना करते की दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो,” असेही डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या श्रद्धांजलीपर भावना व्यक्त केल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×