Breking News
नागरिककेंद्रित विकासातून शाश्वत विकासाला गती द्या – मुख्य सचिव राजेश अग्रवालपुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्धगणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यात २७ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्तगुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची १५ लाखांची फसवणूकज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीलाजिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध कामकाज आढावा बैठका संपन्नडीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न

भोंदू बाबाची ‘आरती’ अन ‘पायधुणी’

भोंदू बाबाची ‘आरती’ अन ‘पायधुणी’

पुण्यातील राधामोहन मिश्राचे व्हिडिओ व्हायरल

marathinews24.com

पुणे – स्वतःला ईश्वराचा अवतार असल्याचे सांगून महिलांवर लैिंगक अत्याचार करणार्‍या पुण्यातील राधामोहन मिश्रा या भोंदूचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो भक्तांकडून आरती करवून घेत असून, पाणी आणि दुधाने त्याचे पाय धुवून काही महिलांसह तरूणी ते प्राशन करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राधामोहन मिश्रा (वय ५९, रा. उबाळेनगर, वाघोली ) त्याचा साथीदार स्वामी कंवल नयन (वय ५८) यांच्यासह ६ महिलांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना खराडी पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यात भाडोत्री खोलींवर चोरट्यांची नजर – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या आई-वडिलांची भोंदू मिश्रावर प्रचंड श्रद्धा होती. त्याचाच गैरफायदा घेत त्याने स्वत:ला दैवी शक्ती लाभलेला अवतार असल्याचे भासवत तरुणीला मानसिकदृष्ट्या जखडून ठेवले. तिचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला. तिला मूत्र पाजणे, मारहाण करणे, विजेचे शॉक देणे अशा अमानुष प्रकारही त्याने केले. पीडितेला तिच्या पतीपासून विभक्त होण्यास भाग पाडून तिची मालमत्ताही स्वत:च्या नावावर करून घेतली. तसेच कुटुंबीयांच्या नजरेत पीडितेला खोटे ठरवून मिश्राने अनेक वर्षे प्रभाव टिकवून ठेवला.

भोंदू मिश्राचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये मिश्राची भक्तांकडून आरती केली जात आहे. तसेच काही महिलांसह तरूणी पाणी आणि दुधाने त्याचे पाय धुऊन प्राशन करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विद्येच्या माहेरघरात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला धांगडधिंगा चर्चेत आला आहे. दरम्यान, १७ वर्षांच्या छळानंतर पीडितेने धाडस दाखवत घरी जाऊन आई-वडिलांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांच्याही डोळ्यांवरील श्रद्धेचा पडदा दूर झाला. पीडितेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली असून, खराडी पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

भोंदू खरातची मिश्राकडून पुनरावृत्ती

नाशिकमधील भोंदू अशोक खरात यानेही अशाच पद्धतीने महिलांना वश करीत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. त्याची पाद्यपूजा करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्याप्रमाणे भोंदू राधामोहन मिश्रा यानेही भक्तांकडून पाय धुवून ते प्राशन करण्यास भाग पाडले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भोंदू मिश्रा खाटेवर आडवा पसरला असून, भक्त त्याची पाद्यपूजा केल्यानंतर त्याच्या नावाची आरती करताना दिसत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×