Breking News
मनसेच्या आंदोलनानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यानी कंत्राटदाराला झापलेदुचाकीवर गांजाविक्रीचा प्रयत्ननागरिककेंद्रित विकासातून शाश्वत विकासाला गती द्या – मुख्य सचिव राजेश अग्रवालपुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्धगणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यात २७ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्तगुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची १५ लाखांची फसवणूकज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीलाजिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध कामकाज आढावा बैठका संपन्नडीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावी

पुण्यात भाडोत्री खोलींवर चोरट्यांची नजर

ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीला

लॅपटॉप, मोबाइल चोरीला

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात भाडोत्री खोलीत (पी.जी) राहणार्‍या विद्यार्थ्यांच्या ऐवजावर चोरट्यांकडून डल्ला मारला जात आहे. मागील अनेक दिवसांपासून विविध पी.जी मध्ये राहणार्‍या विद्यार्थी, नोकरदार तरूण-तरूणींच्या ऐवजची चोरी झाली आहे. संबंधित टोळी मोठ्या प्रमाणावर लुट करीत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

खोलीचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी साडेसात हजारांची रोकड, मोबाइल, लॅपटॉप असा ९८ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १९ ते २० जूनला हडपसरमधील पीजीसीवी हर्षवर्धन, टिळेकर वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरूणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर दुसर्‍या घटनेत चोरट्यांनी खराडीतील साई बॉईज पीजीमधून मोबाइल, लॅपटॉप असा ८७ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १६ जूनला सकाळी सात ते साडेआठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार गायकवाड तपास करीत आहेत.

सकाळच्या वेळी मारला जातोय डल्ला

पी.जी मध्ये राहणार्‍या विद्यार्थ्यांसह काही नोकरदारांना सकाळी लवकर कामावर जावे लागते. त्यामुळे त्यांच्यातील काहीजण कामावर जाताना दरवाजा उघडा ठेउून जातात. नेमकी तीच संधी साधून चोरटे पी.जी मध्ये शिरून चोरी करीत असल्याचे दिसून आले आहे. वारंवार घडणार्‍या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा माग काढण्याची मागणी केली जात आहे.

खोलीमालकासह पोलिसांकडून हात वर

भाडोत्री खोलीत राहणार्‍यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या ऐवजाची जबाबदारी घेण्यात खोली मालकाकडून नकार दिला जात आहे. चोरीची घटना घडल्यानंतर अनेकांकडून हात वर केले जात आहेत. तर दुसरीकडे अशा घटनांना वाचा फोडण्यासाठी पोलिसांकडे तपासाला वेळच नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चोरट्यांचे फावले असल्याचे बोलले जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×