Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

पुण्यातील पाणी कपातीवर पर्याय

पुण्यातील पाणी कपातीवर पर्याय

‘डेड स्टॉक’ वापरण्याची सामाजिक कार्यकर्ते जयंत इनामदार यांची मागणी

marathinews24.com

पुणे – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा केवळ २४.३० टक्क्यांवर आल्याने शहरात पाणी कपात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध इमारतींमध्ये असलेल्या अग्निशमन टाक्यांमधील (फायर टँक) ‘डेड स्टॉक’ पाणी वापरण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत इनामदार यांनी पत्रकार परिषदेत केली.

बुद्धीरंजन करणाऱ्या रहस्यकथांची निर्मिती आवश्यक-भारत सासणे – सविस्तर बातमी 

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अत्यल्प साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर अनेक भागांत टँकरच्या पाण्याचे दर वाढू लागल्याचेही त्यांनी नमूद केले. शहरातील बहुतांश मोठ्या इमारतींमध्ये जमिनीखाली अग्निशमनासाठी स्वतंत्र पाण्याच्या टाक्या असून, त्यातील पाणी आग लागल्याशिवाय वापरले जात नाही. अशा टाक्यांमधील साठ्याची एकत्रित गणना केल्यास तो जवळपास पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या एका धरणाच्या साठ्याइतका असू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.

गेल्या १० ते १५ वर्षांपासून अग्निसुरक्षा क्षेत्राचा अभ्यास करताना आणि विविध आगीच्या घटनास्थळी भेटी दिल्यानंतर, प्रत्यक्षात आग विझवण्यासाठी फायर टँक तसेच रस्त्यांवरील फायर हायड्रंटमधील पाणीच वापरले जात असल्याचे निरीक्षण समोर आल्याचे इनामदार यांनी सांगितले. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आग लागल्याच्या वेळी वेळ वाया जाऊ नये म्हणून फायर टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अशा टाक्यांमधील ‘डेड स्टॉक’ पाण्याचा नियंत्रित वापर करण्याबाबत प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा. पुढील एक महिना हा साठा वापरण्यास सुरुवात केल्यास पाणी कपातीची तीव्रता कमी होऊन टंचाईवर काही प्रमाणात मात करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

मागील  15 वर्षात शहर आणि उपनगरात, समाविष्ट गावांत ज्या सोसायट्या, मॉल आणि अन्य वास्तु निर्माण झाल्या आहेत, त्या सर्वांना फायर टँक बंधनकारक आहेत. यामुळे या सर्व पाणी साठयाचा एकत्रित विचार केला तर तो साठा अंदाजे चारशे कोटी लीटर म्हणजे आपल्याकडे असलेल्या धरण साठया एवढा असल्याचे इनामदार यांनी सांगितले. शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावाची दखल घेऊन प्रशासनाने तज्ज्ञांशी चर्चा करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×