पुण्यातील गणेशोत्सवाची पर्वणी विलक्षणच

परंपरा, एकात्मतेच्या दर्शन म्हणजेच पुणेरी गणेशोत्सव

marathinews24.com

पुणे – सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात वैभवशाली गणेशोत्सवाचा आनंद अनुभविण्याची पर्वणी विलक्षण असते. भाविकांचा उत्साह, ढोल-ताशांचा निनाद, रांगोळ्या, हार-फुले, दैनंदिन पूजा अर्चा, पुणेकरांचे आदरतिथ्य कमालीचे असते. राज्यातील विविध शहरात बंदोबस्त करताना बाप्पांची सेवा करण्याची संधी मिळाली. मात्र, पुण्यातील गणशोत्सव डोळ्याचे पारणे फेडणारा अन आत्मीक समाधान देणारा उत्सव असल्याची भावना पुणे पोलीस दलातील अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. गणशोत्सवाच्या आगामी तयारीच्या अनुषंगाने शहरात नव्याने आलेल्या अधिकार्‍यांना आता बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत.

पिंपरी चिंचवड मध्ये होणार नाट्य संकुल; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा – सविस्तर बातमी

पुण्यातील गणेशोत्सव विविध मंडळांसह भाविकांकडून अतिशय जोषात अन आनंदात साजरा केला जातो. उत्सव प्रत्यक्षात अनुभवयाला मिळणे म्हणजे संचित असून, सांस्कृतिक ठेवा, परखडपणा, सामाजिकतेचे दर्शन म्हणजेच पुणेकरांची ओळख आहे. मानाचे गणपती, हलते देखावे, समाजप्रबोधनपर व्याख्याने, नाटक, आगमनासह विसर्जनाची लगबगही आनंदाची पर्वणीच आहे. दरम्यान, शहरात नव्याने हजर झालेले पोलीस अधिकार्‍यांना बाप्पांच्या सेवेची आस लागली आहे. मध्यवर्ती भागात असलेल्या मानाच्या गणपतींसह नावाजलेल्या बाप्पांच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची सुरक्षा सांभाळण्यासाठी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्यावर विशेष मदार आहे. त्यासोबतच मध्यवर्ती भागातील वाहतूक सुस्थितीत ठेवण्याचीही जबाबादारी वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या टीमवर आहे.

न्यायालयासह शासनाच्या नियमांचे पालन करून बाप्पाच्या उत्सवात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिस दलही डोळ्यात तेल घालून दक्ष आहे. विशेषतः गणेशोत्सवात नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी टेक्नॉलॉजीचा वापरावर भर दिला आहे. प्रामुख्याने उत्सव कालावधीमध्ये प्रवास सहज सुलभ होईल, यासह मध्यवर्ती भागामधील प्रतिष्ठित गणपती मंडळांचे अंतर व वाहनांच्या पार्विंâगची सुविधेसह पुणेकरांना वाहतूक बदलासंदर्भात ऑनलाईनरित्या अपडेटस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागात ये-जा करणार्‍या नागरिकांना फायदा होणार आहे. उत्सव धुमधडाक्यात साजरा होत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनीही कंबर कसली आहे. साध्या वेशातील कर्मचारी, बॉम्ब शोधक व नाशक पथक, गुन्हे शाखेची विविध पथक दिवसरात्र भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणार आहेत.

गणेशोत्सवाची ख्याती जगभर असून देशविदेशातील पर्यटकांसह भाविक आपसूक पुण्याकडे धाव घेतात. राज्यात विविध पोलीस अधिकार्‍यांकडून काम करताना ठिकठिकाणच्या गणेशोत्सवाची वेगवेगळी परंपरा अनुभविली आहे. पंरतु, पुण्यातील गणेशोत्सवाच्या पर्वणीला तोड नसून, विशेषतः उत्सवातील वातावरण, मंडळांची लगबग, भाविकांची गर्दी, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. बाप्पांच्या आगमन ते विसर्जन कालावधीतील सांस्कृतिक सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी पुणे पोलीस दल आतुर झाले आहे. सांस्कृतिक ठेवा जपणार्‍या नागरिकांनी खर्‍या अर्थाने बाप्पांच्या चरणी लीन होउन उत्सवाचे पावित्र्य जपले आहे. बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमनारे आसमंत ऐकण्यासाठी भाविकांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे कान आतुर झाले आहेत.

शहरातील गणशोत्सव साजरा करण्यसाठी मंडळांची तयारी पुर्ण झाली असून, त्याचप्रमाणे पोलीस दलानेही दक्षता घेतली आहे. विशेषतः मानाचे आणि प्रतिष्ठीत बाप्पांच्या दर्शनासासाठी होणारी गर्दी, नियोजन, वाहतूक व्यवस्था, अनुचित प्रकार टाळण्यासाठी उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत केले आहे. वैभवशाली परंपरा असलेला गणशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होताना मनस्वी आनंद आहे. भाविकांसाठी पुणे पोलीस दलही दिवसरांत्र तन-मनाने सेवा बजाविण्यासाठी कार्यरत आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×