Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

आंदेकर खूनातील मुख्य आरोपीची डांगडिंग

आंदेकर खूनातील मुख्य आरोपीची डांगडिंग

डेक्कनमध्ये पोलिसांच्या नाकावर टिच्चून फिल्मी स्टाईल एन्ट्री

marathinews24.com

पुणे – शहरातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुरज ठोंबरे हा सध्या जामिनावर आहे. न्यायालयाने त्याला पुणे शहरात न येण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. मात्र, रविवारी (दि. २४) ठोंबरेने पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून २०० तरूणाचा जमाव जमवून डेक्कनमध्ये एन्ट्री मारली होती. एका संघटनेच्या प्रवेशासाठी तो डेक्कनमधील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमात हजर होता.

तर फ्रेशर पार्टी आयोजकांचा परवाना रद्द करू; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा – सविस्तर बातमी 

नाना पेठेत गुंड सुरज ठोंबरेसह साथीदारांनी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी टोळीला अटक करीत तुरुंगात डांबले होते. मात्र, काही दिवसांपुर्वी न्यायालयाने आरोपी ठोंबरे याला जामीन मंजुर केला होता. त्याला पुण्यात न येणाच्या अटीवर जामीन दिला असतानाही तो २४ ऑगस्टला २०० जणांच्या जमावासह डेक्कन नदीपात्रात आला. त्यातील अनेकजण विविध गुन्ह्यातील आरोपी असल्याचेही दिसून आले होते. तडीपार आरोपी आणि जामीनावर असलेले गुन्हेगार मिळून सुमारे २०० जणांनी परिसरात शक्तीप्रदर्शन केले. तब्बल १ तासाहून अधिक टोळक्याने परिसरात थांबवून डेक्कन पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिस पाहताच सुरज ठोंबरे फरार झाला.

आरोपीने हवेत गोळीबाराची चर्चा, पोलिसांकडून नकार

आरोपी सूरज ठोंबरे हा साथीदारांसह डेक्कनमध्ये आला होता. त्यावेळी त्याने हवेत गोळीबार केल्याची चर्चा होती. मात्र, असा कोणताही प्रकार घडला नसून, आरोपीच्या शोधार्थ पुणे पोलिसांची पथके कार्यरत आहेत. लवकरच याप्रकरणी आम्ही ठोस कारवाई करू असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. दरम्यान, ठोंबरेच्या शोधासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×